शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्युबिली हायस्कूलने रोवला मानाचा तुरा

By admin | Updated: November 6, 2014 01:11 IST

इंग्रजकालीन ज्युबिली हायस्कूल आपल्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहे. प्राचीन विद्यालय म्हणून ओळख असलेल्या या विद्यालयाने आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केली आहे.

चंद्रपूर: इंग्रजकालीन ज्युबिली हायस्कूल आपल्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहे. प्राचीन विद्यालय म्हणून ओळख असलेल्या या विद्यालयाने आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केली आहे. विद्यार्थी घडविण्याचे काम करणाऱ्या या शाळेतील अनेक विद्यार्थी उच्चपदावर गेले आहे. एवढेच नाही तर, शाळेत शिक्षण घेणाऱ्यांपैकी तब्बल चार जणांना मंत्रीपद मिळाले आहे. यातील मा.सा.कन्नमवार यांनी मुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. या याळेतील माजी विद्यार्थी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आता राज्याच्या अर्थमंत्र्याची जबाबदारी आली आहे.ज्युबिली हायस्कूल राज्याला एक मुख्यमंत्री आणि तीन मंत्री देणारे जिल्ह्यात पहिले विद्यालय ठरले आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, राज्य मंत्रिमंडळात वनमंत्री राहिलेले जिल्ह्यातील दिवंगत नेते वामनराव गड्डमवार आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे.राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा. कन्नवार हे ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. १९४२ ते १९४४ या कालावधीत पोटदुखे ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी होते. राज्य मंत्रिमंडळात वनमंत्री राहिलेले जिल्ह्यातील दिवंगत नेते वामनराव गड्डमवार सुद्धा ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी होते. १९४९ ते १९५५ या कालावधीत गड्डमवार ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी होते. राज्याचे नवनियुक्त वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याच विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. १९७० ते ७६ या कालावधीत मुनगंटीवार ज्युबिली हायस्कूलमधून ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. या महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत के. सुदर्शन आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा शिक्षण घेतले आहे. तर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, क्रिकेटर पी.के. नायडू, लोकनायक श्रीहरी अणे, साहित्यिक वा.कृ.चोरघडे, के.जी. पुरोहित, आयएएसमध्ये आर.एन. बोनगीरवार, सुरेश जोशी, मधुसूधन ताकसाळे, जी.आर. देवईकर, आयपीएसमध्ये गोवर्धन, गोहोकर यांच्यासह अनेक मान्यवरांनीही या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. (नगर प्रतिनिधी)