शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

९० हजार कि.मी.चा प्रवास ५ हजारावर थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व दळणवळणांची साधणे बंद झाली. यामध्ये एसटीसुद्धा सुटली नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प पडली. परिणामी एसटीलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यातून मार्ग काढत राज्य शासनाने जिल्ह्यांतर्गत एसटीच्या फेऱ्यांना परवानगी दिली. यामाध्यमातून प्रवाशांची सेवा तसेच एसटीला नुकसानीतून बाहेर काढणे हे दोन पर्याय होते.

ठळक मुद्देलालपरी संकटात : जिल्ह्यांतर्गत दिवसातून केवळ २१ फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन महिन्यांपासून बंद असलेल्या एसटीला राज्य शासनाने जिल्हांतर्गत बस फेºया सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र प्रवाशीच येत नसल्यामुळे एसटीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनपूर्वी चंद्रपूर विभागात दररोज ९० हजार कि.मी. प्रवास करणारी लालपरी आजघडीला जेमतेम ५ हजार कि.मी.च धावत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व दळणवळणांची साधणे बंद झाली. यामध्ये एसटीसुद्धा सुटली नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प पडली. परिणामी एसटीलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यातून मार्ग काढत राज्य शासनाने जिल्ह्यांतर्गत एसटीच्या फेऱ्यांना परवानगी दिली. यामाध्यमातून प्रवाशांची सेवा तसेच एसटीला नुकसानीतून बाहेर काढणे हे दोन पर्याय होते. दरम्यान, एसटी आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र प्रवासीच बाहेर पडत नसल्यामुळे सुरू केलेल्या एसटीच्या फेऱ्याही बंद करण्याची वेळ सध्या महामंडळावर आली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यांतर्गत दररोज २१ बस सुरू आहे. प्रवासी वाढल्यास या बसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. चंद्रपूर विभागात मंगळवारी २१ बसद्वारे १२१ फेऱ्या मारण्यात आल्या. यामध्ये ५ हजार ८८४ कि.मी.चा प्रवास एसटीने केला. मात्र प्रवाशांच्या तुलनेमध्ये अत्यल्प उत्पन्न मिळाल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. लॉकडाऊनपासून खासगी बस सेवा बंद आहे, असे असतानाही लालपरीला पाहिजे त्या प्रमाणात आजच्या घडीला प्रवासीच मिळत नसल्याचे चित्रआहे. लॉकडाऊनपूर्वी चंद्रपूर विभागामध्ये दररोज ९० हजार कि.मी. प्रवास करून आर्थिक उत्पन्न मिळविणारी बस लॉकडाऊनमध्ये ५ हजार कि.मी. प्रवास करीत आहे.मात्र यातही महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.कर्मचाऱ्यांना दिलासाराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एसटी कर्मचाºयांना विमा कवच म्हणून सानुग्रह सहाय्य ५० लाख रुपये अदा करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुरांना राज्य सीमेवर सोडणे तसेच जिल्हांतर्गत वाहतूक करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी शासनाच्या मदतकार्यात रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे मदतकार्य करताना कोरोनाशी संबंध येऊन एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी ५० लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य काही अटींच्या अधीन राहून प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात का, होईना एसटी महामंडळातील कर्मचारी, अधिकाºयांना दिलासा मिळाला आहे.प्रवाशांकडून अल्प प्रतिसादकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक दहशतीत आहे. त्यामुळे प्रवास करणे टाळत असल्यामुळे एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. काही नागरिक कामानिमित्त बाहेर निघाले तर दुचाकी किंवा कारचा वापर करीत आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय कामे होत नसल्यामुळे ग्रामीण नागरिक शहरात येण्याची टाळत आहे.बसच्या स्वच्छतेवर अधिक भरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. लॉकडाऊनपूूर्वी आगारातून निघताना बसची स्वच्छता केली जायची. आता मात्र प्रत्येक फेऱ्यानंतर बसची स्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे, सोशल डिस्टन्ससाठी बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवाशांना बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ५० टक्के प्रवासी सु्द्धा सध्या बस मध्ये दिसत नाही.लॉकडाऊनपूर्वी चंद्रपूर विभागात एसटी ९० हजार कि.मी. प्रवास करीत होती. मात्र सध्या ५ हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी, प्रवासी संख्या, सोशल डिस्टन्स ठेवून बस सोडल्या जात आहे.- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

टॅग्स :state transportएसटी