गांजा व कातडीप्रकरणी दुसरा आरोपी जेरबंद

By Admin | Updated: March 26, 2015 00:49 IST2015-03-26T00:49:36+5:302015-03-26T00:49:36+5:30

कुर्झा मार्गावर अश्वीनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगेत गांजा व कातडी ठेवल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी २० मार्चला महेश तिमाची देसाई ...

Jeraband, the second accused in the case of Hemp and skin | गांजा व कातडीप्रकरणी दुसरा आरोपी जेरबंद

गांजा व कातडीप्रकरणी दुसरा आरोपी जेरबंद

ब्रह्मपुरी : कुर्झा मार्गावर अश्वीनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगेत गांजा व कातडी ठेवल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी २० मार्चला महेश तिमाची देसाई (२५) रा. कुर्झा याला अटक केली. तर बुधवारी त्याला या प्रकरणात सहाय्य करणारा दुसरा आरोपी जयराम लहरीराम मडावी रा. उपदली याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली.
पहिला आरोपी महेश तिमाजी देसाई याने कुर्झा वॉर्डातील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याने गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात आरोपी हा दोन वर्ष चंद्रपूर कारागृहात राहिला. २१ जानेवारी २०१५ रोजी कारागृहातून त्याची सुटका झाली. त्यामुळे सुड घेण्यासाठी दुसरा आरोपी जयराम लहरीराम मडावी याच्याकडून गांजा व जंगली जनावराचे चितळ्याचे चामडे आणून १९ फेब्रुवारीला मोरेश्वर करंबे कुर्झा वार्ड यांच्या दुकानात महाविद्यालयीन तरूणाच्या हाताने ठेवले होते. फिर्यादी मोरेश्वर करंबे यांना फसविण्याकरिता आरोपीने स्वत: वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून गांजा व चामड्याची माहिती दिली होती. मात्र त्यांचा डाव फसला. (प्रतिनिधी)

Web Title: Jeraband, the second accused in the case of Hemp and skin