शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाने अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

चंद्रपूर : भारतातील जैन समाजाला २०१४मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला. भारतीय संविधानातील तरतुदीमुळे मिळालेली ही ओळख आपला धर्म, इतिहास व ...

चंद्रपूर : भारतातील जैन समाजाला २०१४मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला. भारतीय संविधानातील तरतुदीमुळे मिळालेली ही ओळख आपला धर्म, इतिहास व परंपरांची अस्मिता कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षण, उद्योग, व्यवसाय व सामाजिक उत्कर्षासाठी अल्पसंख्याक याेजनांचा लाभ घेऊन जैन समाजाने प्रगती करावी, असे आवाहन ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. सराफा लाईनमधील जैन मंदिरात बुधवारी आयोजित जागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनचे महामंत्री संदीप भंडारी, विनय, सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष योगेश गांधी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष गांधी म्हणाले, जैन समाज हा सर्वाधिक कर देणारा व उच्चशिक्षित समाज आहे. दानधर्म करण्यातही पुढे आहे. उद्योग-व्यवसायात अग्रेसर असला तरी देशभरात जैन समाजातील सुमारे ३० टक्के घटक आजही गरिबीत जीवन कंठत आहेत. त्यामुळे समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक योजनांचा उपयोग केला पाहिजे. मात्र, योजनांच्या माहितीपासून जैन समाज अनभिज्ञ आहे. यासाठीच ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याचे गांधी यांनी सांगितले. सम्राट अशोकाच्या काळात या देशात ४० जैन समाज होता, असा इतिहास सांगतो. परंतु, आपण स्वत:पासूनच दूर जात असल्याने जैन समाज आज असंघटीत आहे, अशी खंतही गांधी यांनी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी २२ राज्यांमध्ये ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनच्या ६५० शाखा कार्यरत आहेत. समाजातील विधवा महिलांना दरमहा ५ हजारांची मदत केली जाते, असेही गांधी यांनी सांगितले. योगेश भंडारी यांनी अल्पसंख्याक संकल्पनेचे महत्त्व सांगून योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र लोढा यांनी केले. यावेळी रवींद्र बैद्य, जितेंद्र चोरडिया, अमर गांधी, जितेंद्र मेहर, राज पुगलिया, निर्भय कटारिया, पेनबाबू भंडारी, जितेंद्र जोगड, यश मुनोत, महेंद्र मंडलेचा, राजेश डागा आदी जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

- तर दरवर्षी मिळू शकतो ५०० कोटींचा निधी

केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने जैन समाजासाठी अल्पसंख्याक विभागाकडून सात वर्षांत ६३० कोटींचा निधी मिळू शकला. यातून जैन समाजात विविध उपक्रम राबवता आले. देशभरात जागृती झाली तर दरवर्षी ५०० कोटींचा निधी मिळू शकतो. त्यामुळे जैन समाजाने स्वत:पुरताच विचार न करता, देशभरातील गरीब जैन समाजाचाही विचार करावा, असे आवाहन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.