बल्लारशाह महाराष्ट्रात मग गोंदिया नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:42+5:30
गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५ किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे.

बल्लारशाह महाराष्ट्रात मग गोंदिया नाही का?
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर सुरू केली आहे. बल्लारशाह येथून या पॅसेंजरसाठी तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना चांदाफोर्टला जाऊन ट्रेन पकडावी लागत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गोंदिया पॅसेंजरला बल्लारशाहकडे येण्यास आणि बल्लारशाहमधून प्रवाशांना तिकीट देण्यास मध्य रेल्वे विभागाचा काय आक्षेप आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही काय, असा थेट प्रश्न झेडआरयूसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी उपस्थित केला असून त्यांनी मध्य रेल्वेसह केंद्र, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधीला निवेदन पाठविले आहे.
गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५ किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन बल्लारशाह ट्रेन पाठवण्यासाठी आणि प्रवाशांना तिकीट देण्यासाठी तयार आहे, मग मध्य रेल्वे विभागाला यावर आक्षेप का, असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोरोनाचा धोका लक्षात घेता अनारक्षित तिकिटे देण्यास मनाई करण्यात आल्याचे उत्तर मिळाल्याचेही सुंचूवार यांनी म्हटले आहे. गोंदिया पॅसेंजर चालविण्यासाठी परवानगी आहे. मग केवळ बल्लारशाहपर्यंत ट्रेन आणण्यास काय हरकत आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बल्लारपूरपर्यंत ही ट्रेन सुरु करण्याची मागणी आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अनारक्षित तिकिटे देत आहे. मग मध्य रेल्वेला काय समस्या आहे. एका मंडळासाठी एक नियम आणि दुसऱ्या मंडळासाठी दुसरा? रेल्वे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही ट्रेन बल्लारशाहपर्यंत चालवावी आणि बल्लारशाहमधूनही प्रवाशांना तिकिटे द्यावीत. बल्लारशाह महाराष्ट्रात आहे तर गोंदिया महाराष्ट्रात नाही का?
-श्रीनिवास सुंचूवार,
झेडआरयूसी सदस्य, मध्य रेल्वे