शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करीत अल्पवयीन मुलांचा सहभाग

By admin | Updated: February 21, 2017 00:32 IST

जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि काहींच्या हाताला नवा रोजगार गवसला आहे.

धाबा पोलिसांची कारवाई : बारावीच्या विद्यार्थ्याला अटकधाबा : जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि काहींच्या हाताला नवा रोजगार गवसला आहे. प्रतिष्ठा बाजूला ठेवून काही प्रतिष्ठितही या व्यवसायात उतरले आहेत. मोठा नफा, नगदी पैसा मिळत असल्याने आता अल्पवयीन मुलेही या व्यवसायात उडी घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना धाबा पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाला. त्यानंतर तळीरामाची तहान भागविण्यासाठी अनेक हात पुढे येऊ लागले आहेत. दारूबंदीला अवैध दारूविक्रीचे मोठे ग्रहण लागले आहे. मोठा नफा अन् नगदी पैसा असल्याने या व्यवसायात येणाऱ्यांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे. चक्क पोलीस ठाण्यातून दारूविक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराने जिल्हा हादरला. आता चक्क विद्यार्थीही दारूविक्री व्यवसायात उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाबा उपपोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे शनिवारी पोलिसांनी अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. परंतु एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे यांनी दिली. नंदी मल्लाजी चंद्रगिरीवार रा. मुलचेरा, राजकुमार रमेश मोहुर्ले रा. घडोली, मिराबाई तुळशिराम कासेवार अशी आरोपींची नावे आहेत तर संतोष तुळशिराम कासेवार हा फरार आहे. आरोपीकडून सात हजार रुपये किमतीची दारु, दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एक बारावीचा विद्यार्थी आहे. पोलीस जवान गस्तीवर असताना डोंगरगावजवळ ही कारवाई करण्यात आली. युवराज खेवले, बाबा नैताम, अरविंद राठोड, नरेश नन्नावरे, श्यामा पाल या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकानी ही कारवाई केली. दरम्यान, जप्त करण्यात आलेला दारुसाठा तेलंगणामार्गे जिल्ह्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)तेलंगणातून तस्करीधाबा परिसराची सीमा तेलंगणाला लागून आहे. त्यामुळे तेलंगणातून दारू तस्करी होत असल्याची माहिती आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांसाठी धाबा उपपोलीस स्टेशनअंतर्गत येणारी गावे डेंजर झोन ठरली आहेत. दारूबंदी झाल्यापासून धाबा पोलीस सतत कारवाई करीत आहेत. काही मोठ्या कारवाया या पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आल्या आहेत.