शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आत्महत्या प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: March 16, 2015 00:41 IST

येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला असलेल्या तरुणीचा, तिचा प्रियकर आणि एका मित्राचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला.

बल्लारपूर : येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला असलेल्या तरुणीचा, तिचा प्रियकर आणि एका मित्राचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. सदर प्रकरण त्रिकोणी प्रेमातून घडल्याची शहरात चर्चा आहे. या घटनेला आठवड्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहोचलेच नसल्याने नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावल्या जात आहे. दरम्यान, मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे येथील आत्महत्या प्रकरण सध्यातरी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.सोमवार ९ मार्च रोजी वर्धा नदीच्या राजुरा पुलाजवळ रोजा लखपती बानोत (२२), नीलेश पवार (२५), अमोल अंड्रस्कर (२६) या तिघांचा मृत्यू झाला. रोजा मागील आठ महिन्यापासून येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला होती. येथील कामावरून तिच्या प्रियकरासोबत नेहमी खटके उडत होते. यावरून निलेशचा संशय वाढत गेला. अशातच नीलेशचे डॉक्टरसोबत भांडण झाले. याबाबत दोघेही पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. यावेळी जर पोलिसांनी समझोता करण्यापेक्षा तक्रार नोंदविली असती तर, किमान तिघांचा जीव वाचला असता, असे नागरिकांमध्ये आता बोलल्या जात आहे. एवढेच नाही तर, पोलिसांच्या तपासावरही नागरिकांनी तर्कवितर्क लावणे सुरु केले आहे. ज्या दिवशी डॉक्टरसोबत निलेशचे भांडण झाले. त्या दिवसापासून रोजा व्यथीत झाली होती. तिने निलेशला समजविण्याचा प्रयत्नही केला. एवढेच नाही तर तिने डॉक्टरची माफी मागण्याची गळ घातली. मात्र चूक नसल्याने आपण माफी मागायची तरी कशाला, अशी भूमिका निलेशची होती.दोघांचेही भांडण टोकाला गेल्यानंतर अमोल अंड्रस्करला बोलावण्यात आले. कारण नसतानाही केवळ मित्राच्या आग्राखातर अमोल वर्धानदीवर पोहचला आणि त्या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचाही जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणातील मूळ सुत्रधाराचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणी आता मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)