शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची प्लास्टिक पन्नी जप्तीची मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेधारकांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना प्लास्टिकमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने खर्रासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पानठेल्यांवर तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणे सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम प्रारंभ केली आहे. गत काही दिवसांपासून महानगरपालिकेची सुरू केलेली ही कारवाई कायम सुरू राहणार असून प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेधारकांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना प्लास्टिकमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने खर्रासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पानठेल्यांवर तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणे सुरू केले आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिंगल यूज प्लास्टिक वापरास पूर्णपणे बंदी आहे, तरीही काही दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करताना दिसून येत असल्याने त्यांच्या विरोधात जप्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. मनपातर्फे सिंगल यूज प्लास्टीकबाबत पानठेलाचालकांना माहिती देण्यात येत आहे, शिवाय प्लास्टीक पन्नीचा वापर न करण्यासंबंधी त्यांच्याद्वारे स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे. मात्र यानंतरही जर प्लास्टीक पन्नी आढळून आली तर दंडात्मक कारवाई करून स्थायी स्वरूपाच्या पानटपरी बंद करण्यात येतील व अस्थायी स्वरूपाच्या पानटपरी अतिक्रमण विभागाद्वारे उचलून मनपा कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व पानटपरी चालकांना 'येथे प्लास्टीक पन्नी मिळत नाही ' अशाप्रकारचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. वस्तुत: पन्नीसाठी बटर पेपरचा पर्याय पानठेलाचालकांकडे उपलब्ध आहे. मात्र याचा वापर फार कमी प्रमाणात करण्यात येत असल्याने महानगरपालिकेच्या तीनही झोनमध्ये कारवाई करण्यात येत आहे.नागरिकांनी महापालिकेच्या या मोहिमेत सहभागी होऊन कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा, दुकानदारांवर अवलंबून न राहता घरातून कापडी पिशवी नेऊन सामान खरेदी करावे, दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रपूर मनपाने केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी