शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी संस्थांनी परस्पर कर्ज पुनर्गठन केल्याने अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

शेतकरी खरीप हंगामासाठी दरवर्षी सेवा सहकारी संस्थांकडून बँकेमार्फत पीककर्ज घेतात. रब्बी व खरीप हंगामाला आर्थिक अडचण जाणार नाही, यासाठी शेतकरी पीक कर्जासाठी शासनाने लागू केलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ज्या गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा गावातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण केले जाते. परंतु कर्ज पुनर्गठन करताना शेतकऱ्यांची परवानगी घेण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देफक्त २५ टक्के कर्जमुक्ती : शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाईन तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांचे कर्जमाफीधारक शेतकरी म्हणून नाव समाविष्ट करण्यात आले. परंतु २०१७ रोजी शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता जिल्ह्यातील बहुतांश सेवा सहकारी संस्थांनी पीक कर्जाचे परस्पर पुनर्गठन (रूपांतर) केले. त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या कर्जधारक शेतकऱ्यांना फक्त २५ टक्के कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने शासनाने केलेल्या कर्जमुक्ती घोषणेचे काय, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.शेतकरी खरीप हंगामासाठी दरवर्षी सेवा सहकारी संस्थांकडून बँकेमार्फत पीककर्ज घेतात. रब्बी व खरीप हंगामाला आर्थिक अडचण जाणार नाही, यासाठी शेतकरी पीक कर्जासाठी शासनाने लागू केलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ज्या गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा गावातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण केले जाते. परंतु कर्ज पुनर्गठन करताना शेतकऱ्यांची परवानगी घेण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. परंतु, राजुरा तालुक्यातील बहुतांश सहकारी संस्थांनी कर्जाचे पुनर्गठण करताना संबंधित शेतकऱ्यांना माहिती दिली नाही. त्यामुळे पुनर्गठन केल्यानंतर कर्जाची रक्कम किती, याची शेतकऱ्यांना माहितीच मिळालीनाही.२०१७ रोजी बहुसंख्य शेतकऱ्यांनी न विचारताच कर्ज पुनर्गठण प्रक्रिया पूर्ण केल्याने रक्कम फरक दिसत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.राज्य सरकारने दोन लाखांच्या आत थकीत रक्कम असणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना केली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे आणि शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्यां सहकारी पथसंस्थांनी पीक कर्जाचे चुकीचे पुनर्गठन केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा १०० टक्के लाभ मिळाला नाही. या अन्यायाविरूद्ध शेतकºयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅनलाईन तक्रार केली आहे.थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्ज प्रस्तावाला नकारकोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. ऐन खरीप हंगाम तोंडावर असताना त्यांची अर्थव्यवस्था कोलमडल्याने पीक कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवा केली. दरम्यान, राज्य सरकारने कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्याची घोषणा केली. थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज शासनाच्या नव्याने नोंदविण्या सूचना बँकांना दिल्या. मात्र, यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता घेतली नाही. घोषणा करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडे राज्याने पत्र पाठविले. बँकेने याबाबत अद्याप काहीही सूचना दिल्या नाही. याचाच आधार घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्हा शाखांनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाचे प्रस्ताव मंजूर केले नाही. थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अजूनही लाभ मिळाला नाही. शिवाय, खरीप हंगामात कर्ज देण्यास विलंब होत आहे.गोवरी येथील सेवा सहकारी संस्थेकडून मी खरीप हंगामासाठी पीककर्ज घेतले. त्यानंतर २०१७ रोजी मी घेतलेल्या पीक कर्जाचे मला कोणतीही सूचना न देता परस्पर पुनर्गठण करण्यात आले. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा मला पुरेपूर लाभ मिळाला नाही. माझ्यासारख्या जिल्हाभरातील अन्य शेतकऱ्यांनाही कर्जाच्या पुनर्गठणाचा फटका बसला आहे.- प्रभाकर इटनकर,शेतकरी, गोवरी

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज