लग्नाला १२ वर्षे उलटूनही मूल होईना; पत्नीनं घेतला वेगळाच निर्णय, पतीनं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 15:26 IST2022-05-17T15:26:18+5:302022-05-17T15:26:45+5:30
चंद्रपुरातील चिमूर तहसीलमध्ये हा प्रकार घडला. ४० वर्षांच्या गोविंदा सदाशिव धानोरकर यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला.

लग्नाला १२ वर्षे उलटूनही मूल होईना; पत्नीनं घेतला वेगळाच निर्णय, पतीनं उचललं टोकाचं पाऊल
चंद्रपूर: विहिरीत उडी घेऊन एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस विहिरीजवळ पोहोचले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. व्यक्तीची पत्नी घर सोडून गेली होती. ती दुसरं लग्न करणार होती. त्यामुळे ते चिंतेत होते. त्या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली.
चंद्रपुरातील चिमूर तहसीलमध्ये हा प्रकार घडला. ४० वर्षांच्या गोविंदा सदाशिव धानोरकर यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला. मात्र त्यांना मूलबाळ नव्हतं. गोविंदामध्ये दोष असल्यानं मूल होत नसल्याचं पत्नीला वाटत होतं. नातेवाईकांकडे लग्नाला जात असल्याचं सांगून गोविंदा यांची पत्नी १५ दिवसांपूर्वी घरातून गेली. मात्र ती परत आलीच नाही.
काही दिवसांनी पत्नीनं गोविंदा यांना फोन केला. आपण दुसरं लग्न करत असल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळे गोविंदा तणावाखाली होते. समाजात बदनामी होईल अशी भीती त्यांना सतावत होती. त्यामुळे गोविंदा दुपारी सायकलवरून निघाले. गावाबाहेर असलेल्या विहिरीत उडी घेत त्यांनी जीव दिला. आसपास असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. गोविंदा यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. ती दुसरं लग्न करणार होती. त्यामुळे गोविंदा तणावाखाली होते. त्यातून त्यांनी विहिरीत उडी घेतल्याचं चिमूरचे पोलीस अधिकारी मनोज गभणे यांनी सांगितलं.