सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश महत्त्वपूर्ण निर्णय ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:27+5:30

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष २०२० करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे.

Important decision for girls to enter military school now. | सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश महत्त्वपूर्ण निर्णय ।

सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश महत्त्वपूर्ण निर्णय ।

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावीकरिता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा हा निर्णय देशातील फक्त दोन शाळांकरिताच घेण्यात आला असून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष २०२० करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे.
पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर येथील सैनिकी शाळेपासून ही सुरूवात होत आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात अत्याधुनिक स्वरूपाची सैनिकी शाळा विसापूर गावानजिक उभारण्यात आली असून या सैनिकी शाळेत आता मुलींना सैनिकी शिक्षण घेण्याची मिळालेली संधी मुनगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकारांपैकी एक मानली जात आहे.

Web Title: Important decision for girls to enter military school now.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.