शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास आंदोलन

By admin | Updated: December 22, 2016 01:59 IST

प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही.

विद्यार्थी संघटनेचा इशारा : प्रकल्प अधिकाऱ्यास निवेदन चिमूर : प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. तसेच २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्तीही विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. या विरोधात सन विद्यार्थी संघटनेने एल्गार पुकारला असून या दोन्ही समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. वसतिगृहामध्ये प्राविण्य गुणाच्या आधारावर प्रवेश दिल्या जातो. त्याची यादी लावली जाते. या यादीत अनेक विद्यार्थ्यांचे नाव नाही. चिमूर तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या राहण्याच्या सुविधेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला. यामुळे दुर्गम ठिकाणातील शिक्षणाकरिता धडपड करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची परवड होत आहे. या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याची मागणी आहे. तसेच मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, मागील वर्षीची शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरण याला कारणीभूत आहे. (तालुका प्रतिनिधी)