शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची भूक आश्वासनावरच विझली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आणि भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली.

ठळक मुद्देऑटोचालकांची व्यथा : हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे बेहाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड महिन्यांपासून ऑटोची चाके थांबली आणि हातावर आणून पानावर खाणाºया जिल्ह्यातील आठ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ आली. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे सरकार, प्रशासन एवढेच नाही, तर लोकप्रतिनिधींकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांच्या पदरी आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न सध्या ऑटोचालकांसमोर आहे.जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आणि भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली.दरम्यान, शासन स्तरावर मदत मिळावी, यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र उपयोग झाला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत जीवनावश्यक साहित्याची किट देण्याची मागणी केली.त्यांनी ऑटोचालकांनी किट देण्याचे मान्य केले. यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. ऑटोचालकांनी तत्परतेने अर्जही दाखल केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.प्रशासनाकडून मदत नाहीलॉकडाऊनच्या काळातही एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी ऑटो चालक धाऊन येत आहे. मात्र त्यांच्या मागे प्रशासनाचा ससेमिरा लागत आहे. एखाद्या गावावरून रुग्णाला घेऊन आल्यानंतर परत जाताना त्या ऑटोचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर पेट्रोलपंपावर पेट्रोल मागूनही दिले जात नसल्याने त्यांची अडचण होत आहे.या आहेत संघटनामहाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनाविदर्भ कामगार ऑटोरिक्षा चालक संघटनाभिमशक्ती ऑटो चालक संघटनामागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवसाय पूर्णत: बुडला आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.- अशोक बुटले, पठाणपुरा

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा