शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात.

चंद्रपूर : पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात. फटाक्यांवरील एवढा मोठा खर्च टाळावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.सामाजिक वनिकरण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील हरितसेनेच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा धूर थांबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फटाक्यांमुळे इतरांची झोप उडवून हवा व ध्वनिप्रदूषित करणे टाळून पर्यावरण रक्षण करुन परिवर्तन घडविण्याचे आवाहनही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. सण, उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाला उधान, त्यातच दिवाळी म्हटले की विचारायलाच नको. फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण. प्राचिन काळी चीन देशात फटाके उडवून मोठे ढोल वाजवून सैतान-भूत पळून जातात म्हणून फटाके फोडले जात होते. १२५ डेसिबलचे बॉम्ब फोडून आपण हवा, ध्वनिप्रदूषण प्रचंड प्रमाणात करुन पर्यावरणाचा नाश करीत आहोत. फटाक्याचा आवाज लहान मुलांमध्ये भीती निर्माण करतो. आजाऱ्यांची फटाके झोप उडवितात. आवाजाची पातळी ५० ते ६० डेसिबलपेक्षा वाढली की अनेक त्रास होतात. रक्तदाब वाढतो, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण वाढतो. निद्रानाश होतो. आम्लपित्तात वाढ होते. ऐकण्यात दोष निर्माण होतो. अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो. या सर्वाबरोबरच फटाक्यावरचा खर्च अनुत्पादक आहे. यासाठी लागणारा कागद, कच्चा माल हा फटाक्याबरोबरच जळतो. फटाक्यामुळे एक प्रकारे आपण बालमजुरीला प्रोत्साहन देत असतो. फटाके तयार करताना, फटाके वाजविताना तसेच फटाका भांडाराला नेहमीच आग लागून अपघात घडतात. ही समाजविघातक कृती आपण लवकरात लवकर थांबवून परिवर्तन घडविणे गरजेचे असल्याचे अंनिसने म्हटले आहे. फटाका ज्वलनाने हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड यासारखे घातक वायू निघतात. त्यामुळे खोकला, दमा हे आजार होतात.(शहर प्रतिनिधी)