शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

घोडपेठच्या विद्यार्थ्यांनी केली तंबाखूची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST

यावेळी प्राचार्य भैय्या तुराणकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून यापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.

ठळक मुद्देशिक्षकांचा पुढाकार : कर्मवीर विद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : तंबाखू, सिगारेट, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्यसनाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. नाही तर त्याचे रूपांतर कर्करोगामध्ये होण्यास वेळ लागत नाही. शाळा, महाविद्यालयांतर्फे यासाठी जनजागृती केली जात आहे. अशीच जागृती घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाने केली असून तंबाखुजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करून विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी प्राचार्य भैय्या तुराणकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून यापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. याप्रसंगी प्राचार्य भैय्या तुराणकर यांनी कर्करोग होवू नये यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका फुलसंगे यांनी कर्करोगाच्या लक्षणांविषयी माहिती दिली. या उपक्रमाला विद्यालयातील पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.वेळीच सावध व्हातंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोग होतो. त्यामुळे यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम पालकांनी आपल्या सवयी सोडल्या पाहिजे. या सवयी सोडल्या नाही तर भविष्यात त्या धोकादायक ठरू शकतात.शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्री करणे गुन्हा आहे. असे असले तरी अनेकजण विक्री करतात. त्यामुळे शिक्षक, पालकांनी सावध राहून संबंधितांची प्रशासनाकडे तक्रार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Socialसामाजिक