गृहकर वसुलीत पंचायत समितीची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST2020-12-23T04:25:33+5:302020-12-23T04:25:33+5:30

घनश्याम नवघडे नागभीड : कोरोनाची पार्श्वभूमी असली तरी नागभीड पंचायत समितीने गृहकर व पाणी कर वसुलीत चांगलीच गती ...

Horse race of Panchayat Samiti in collection of home tax | गृहकर वसुलीत पंचायत समितीची घोडदौड

गृहकर वसुलीत पंचायत समितीची घोडदौड

घनश्याम नवघडे

नागभीड : कोरोनाची पार्श्वभूमी असली तरी नागभीड पंचायत समितीने गृहकर व पाणी कर वसुलीत चांगलीच गती धरली आहे. आतापर्यंत पंचायत समितीने गृहकर ४४.७० टक्के तर पाणीकर ४३.४५ टक्के वसूल केला आहे.

कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून शासनाने लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. या काळात सर्वच व्यवस्था प्रभावित झाल्या. यातून ग्रामपंचायतींची करवसुलीही सुटली नव्हती. मात्र ग्रामंचायतींनी यातून सावरून करवसूलीकडे लक्ष घातले. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी करवसुलीत चांगलीच गती घेतल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे.

नागभीड तालुक्यात ५६ ग्राम पंचायती असून २४ हजार ३८६ करधारक आहेत.या संपूर्ण ग्रामपंचायतींचा अंतर्गत कारभार गृहकर,दिवाबत्तीकर व आरोग्यकर, पाणीकर यांच्यावरच चालत असतो.या शिवाय या ग्रामपंचायतींचे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. ग्रामपंचायतींचे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत आहे. कराच्या वसुलीस सामान्यपणे ऑक्टोबर महिन्यापासून वेग येतो. फेब्रुवारी महिन्यापर्यंत करवसुलीची टक्केवारी ३५ ते ४० टक्के असते. उर्वरित ६५ ते ६० करवसुली ही मार्चमध्येच होते. शासकीय कामासाठी गृहकर पावतीची गरज पडते. मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यातच पंचायत समितीने गृहकर ४४.७० तर पाणी कर ४३.४५ टक्के वसूल केला आहे. पंचायत समितीतंर्गत गृहकराची मागणी २ कोटी २४ लाख ५ हजार रूपये आहे. आतापर्यंत यातील १ कोटी ३७ हजार वसुली करण्यात आली आहे.तर पाणीकराची मागणी ६२ लाख ५८ हजार असून २७ लाख १९ हजार रूपये पाणीकर वसूल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींचे मोठे खर्च

मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये चार ते पाच कर्मचारी आहे. लहान ग्रामपंचायतींमध्ये किमान दोन कर्मचारी आहेत. बहुतेक गावात १० पासून २० पर्यंत विंधन विहिरी आहेत. एका विंधन विहिरीचा देखभाल दुरूस्ती खर्च २ हजार ५०० रूपये आहे. ब्लिचिंग करणे, वर्षभर गावातील दिवाबत्तीची सोय, पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई करणे हे ग्रामपंचायतींचे आवश्यक व मोठी कामे आहेत .

कोट

ग्रामपंचायतीची विविध कामे करामधूनच केली जातात. गाव विकासासाठी नागरिकांनी कर जमा करून ग्रामपंचायतींना सहकार्य करावे.

- प्रणाली खोचरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नागभीड.

Web Title: Horse race of Panchayat Samiti in collection of home tax