शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची आशा मावळली

By admin | Updated: December 27, 2015 01:26 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात विदर्भातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस व धानाला वाढीव भाव मिळेल, ....

अधिवेशन संपले : कापसाच्या भावाला उतरती कळानांदाफाटा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात विदर्भातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस व धानाला वाढीव भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अधिवेशन संपूनही कापूस व धानाचे भाव मात्र समाधानकारक वाढल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे.कापसाला सहा हजार व धानाला चार हजार रुपये भाव मिळावा, यासाठी यापूर्वी विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलने केली. देशाच्या पंतप्रधानांनीही ५० टक्के नफा अधिक उत्पादन खर्च भरून निघेल इतका हमी भाव देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिले. परंतु अधिवेशनात कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांबाबत काहीच निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कृषी विद्यापीठाच्या परीक्षण अहवालानुसार कापसाला साधरणत: सहा हजार ८०० व धानाला पाच हजार रुपये भाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातच खते व बियाण्यांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसते. यावर्षी कापसाला ४ हजार १०० हमीभाव जाहीर करण्यात आला. गरजेपोटी मोठ्या प्रमाणात पीक घेणाऱ्या कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धाधिक कापूस लगतच्या यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यात विक्री केला आहे. वाहतूक खर्च व मजुरांची मजुरी बघता मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे कापूस व धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. काही दिवसाआधी कापसाच्या भावात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. बाजारात ४ हजार ४०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. परंतु दोन दिवसांतच चित्र पालटले आणि आता कापसाला चार हजार रुपयात विक्री करावी लागत आहे. यातच शासनाची अनेक केंद्रावरील खरेदीही बंद असल्याचे दिसते. नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात पिकाची विक्री करावी लागत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना अनेक योजनांची खिरापत वाटप करीत असले तरी दुसरीकडे उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. (वार्ताहर)