ऑक्सिजन उत्पादक उद्योग संचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST2021-05-11T04:28:54+5:302021-05-11T04:28:54+5:30

भांदक येथील श्री पार्श्वनाथ मंदिराच्या इमारतीत ट्रस्टच्या सहकार्याने कोरोना हेल्थ सेंटर व्यवस्थित सुरू आहे. या प्रेरणादायी कार्याबद्दल श्री पार्श्वनाथ ...

Honoring of Oxygen Producers Industry Directors | ऑक्सिजन उत्पादक उद्योग संचालकांचा सत्कार

ऑक्सिजन उत्पादक उद्योग संचालकांचा सत्कार

भांदक येथील श्री पार्श्वनाथ मंदिराच्या इमारतीत ट्रस्टच्या सहकार्याने कोरोना हेल्थ सेंटर व्यवस्थित सुरू आहे. या प्रेरणादायी कार्याबद्दल श्री पार्श्वनाथ मंदिरचे ट्रस्टी भिकमचंद बोरा, कोठारी व डाॅ. सातभाई यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर एम.आय.डी.सी.स्थित ईशान गोयल यांच्या आदित्य गॅसेस व भारत गौर यांच्या रुक्मिणी गॅसेस प्लांटला अहीर यांनी भेट देत चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करून रुग्णांचे जीव वाचवण्यात तुमचे योगदान असल्याचे सांगत प्लांटमालकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या ऑक्सिजन पुरवठ्याचा पुन्हा विस्तार करून समोरही ही सेवा सुरू ठेवून रुग्णांची सेवा करा, जिल्ह्यातील रुग्ण, रुग्णांचे परिवार व नागरिक आपले सदैव ऋणी राहतील, अशा भावना यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Honoring of Oxygen Producers Industry Directors