शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

होमोपॅथिक डॉक्टर करतो अ‍ॅलोपेथिक उपचार

By admin | Updated: December 20, 2014 22:35 IST

गरीब रुग्णांवर योग्य उपचार व्हावा यासाठी १२ वर्षांपूर्वी मूल येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र ज्या उद्देशासाठी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली तो उद्देश यशस्वी होत

मूल : गरीब रुग्णांवर योग्य उपचार व्हावा यासाठी १२ वर्षांपूर्वी मूल येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र ज्या उद्देशासाठी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली तो उद्देश यशस्वी होत नसल्याने रुग्णांमध्ये सध्या रोष व्यक्त केला जात आहे. येथील आयुष्य कक्षातील होमोपॅथिक डॉक्टर चक्क रुग्णांची तपासणी करून अ‍ॅलोपेथिकचा उपचार करीत आहे. वैद्यकीय अधिक्षकाचा प्रभार असलेले डॉ. अनिल गेडाम याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांचे मनोबल वाढत आहे.मूल शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्वविजय खानविलकर यांच्या हस्ते ५ मे २००२ ला ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरुन रुग्णांना योग्य सेवा देण्याचे व रुग्णांशी सौजन्याने वागावे, अशी सूचना केली होती. मात्र १२ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही योग्य सेवा व रुग्णांशी सभ्य वागणूक देण्यास उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अयशस्वी ठरले आहेत. आजच्या स्थितीत ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांमध्ये रुपांतरीत करण्यात आले. दररोज शेकडो बाह्य रुग्ण येतात. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिक्त पदांमुळे रुग्णांवर योग्य उपयोग होत नसल्याने रुग्णांना इतरत्र भटकावे लागत आहे. आजच्या स्थितीत केवळ तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आंतररुग्ण, बाह्य रुग्ण व इतर प्रशासकीय कामे बघला तीन वैद्यकीय अधिकारी काम करण्यास असमर्थ ठरत आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. गेडाम खासगी रुग्णालयात जास्त वेळ घालवितात. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालय फेरफटका मारण्यास त्यांना वेळ नसल्याचा आरोप रुग्ण करीत आहे. येथील काररभार डी.एच.एम.एस होमोपॅथिक डॉक्टरांकडे येथील कारभार सोपवून ते आपली जबाबदारी झटकत आहे. रुग्णालयात असलेल्या आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकारी आपली होमोपॅथिकची औषधी देण्याऐवजी रुग्णांना अ‍ॅलोपॅथिक औषधाचा उपचार करीत आहे. त्यामुळे रुग्णांना चुकीच्या औषधांमुळे एखाद्यावेळी रुग्णांना प्राण गमाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांशी असभ्य बोलणे, शिव्या देणे, नशेत उपचार करणे ही बाब न शोभणारी असताना देखील याकडे वरीष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे रुग्णाचे खच्चीकरण होत आहे. वैद्यकीय अधिक्षकासह सहा वैद्यकीय अधिकाऱ्याने पद रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार आहे. आता त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने लक्ष घालून येथील रुग्णालयामध्ये सुविधा तसेच डॉक्टरांचे रिक्त पदे भरण्याकडे लक्ष द्यावे,अश मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)