शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘सुकन्या समृद्धीला’ नेटवर्कचा ताप

By admin | Updated: February 25, 2015 01:23 IST

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत.

चंद्रपूर : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. मात्र, इंटरनेट सुविधेत वारंवार येत असलेला बिघाड हा कर्मचारी व लाभार्थ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. असाच प्रकार डाक विभागाच्या सुकन्या समृद्ध योजनेचे खाते उघडण्यासाठी दिसून येत आहे. डाक विभागाकडून २ डिसेंबर २०१४ पासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली. योजनेचे खाते उघडण्यासाठी पंधरवड्यापासून डाक कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र, खाते उघडण्यात ‘नेट’ची तांत्रिक अडचण येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, कामे संथगतिने होत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. २२ जानेवारीला या योजनेची सुरूवात झाली आहे. मुलींना कमी लेखल्या जाऊ नये, तिचे ओझे वाटू नये, मुलीला समाजात मानाचे स्थान मिळावे हा उद्देश सुकन्या योजनेतून डाक विभागाने समोर ठेवला. भविष्यात पालकांना मुलीच्या लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, सोबतच ‘बेटी बचाव’ अभियानाला हातभार लागेल, असे बहुविध फायदे या योजनेचे आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेसाठी डाक कार्यालयात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे दुर्लक्षीत डाक विभाग अचानक चर्चेत आला. मात्र, कायम विस्कळीत सेवा देण्यात सराईत असलेल्या ‘बीएसएनएल’मुळे खाते उघडण्याला खोडा बसला आहे. शनिवारी नेटवर्क समस्या उद्भवल्याने खाते उघडण्याचे काम ठप्प झाले. खाते आॅनलाईन उघडायचे असून दुसरीकडे नवीन सॉफ्टवेअर असल्याने डाक कर्मचाऱ्यांना हाताळणीची सवय नाही. प्रशिक्षित कर्मचारीही नाहीत. त्यामुळे एकाच अर्ज भरण्यास बराच वेळ लागत आहे. अशा अनेक समस्यांमुळे ग्राहकांना कासवगतीने सेवा मिळत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)योजनेचे नियम सदर खात्यासाठी पालक ठेवीदार तर मुलगी खातेधारक राहणार आहे. मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षांपर्यंत खाते उघडता येते.पालकाची केवायसी कागदपत्रे, मुलीच्या जन्माचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक.वयाच्या १४ वर्षांपर्यंत रक्कम भरावयाची आहे.वर्षात किमान १ हजार रुपये जमा झाले नाही, तर खाते बंद पडेल.मुलीचा जन्म २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.