शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदुरातील आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST

गडचांदूर शहर व परिसरातील इतर गावांचा विचार केल्यास येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कधीकधी तर रुग्णांवर उपचार

आशिष देरकर - गडचांदूरगडचांदूर शहर व परिसरातील इतर गावांचा विचार केल्यास येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कधीकधी तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागाच उपलब्ध नसते. विविध औषधींचा तुटवडा व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गडचांदुरातील आरोग्य सेवा आजही कोलमडलेली आहे.गडचांदूर औद्योगिक परिसर असल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. दोन-तीन डॉक्टर सोडल्यास खासगी दवाखाने दर्जेदार नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला गडचांदुरात महत्व आहे. खासगी दवाखान्यात उपचार केल्यास हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे रुग्ण ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. मात्र गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. त्यामुळे रुग्णांना गडचांदूर रुग्णालयाबद्दल विश्वासार्हताच नाही.येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. कुत्रा चावला तर ‘रेबीज’ची लस मिळेल याची शाश्वती नसते. रूग्णाला औषधाच्या दुकानातून ती विकत आणावी लागते. बाळंतपणात तर ‘सिझेरियन’ची नवी पद्धत अलीकडे आली आहे. गरिबाला ते परवडणारे नसते. ग्रामीण रुग्णालयात ती सुविधा नसते. अशावेळी जिल्ह्याच्या ठिकाणी वशिला लावूनच रूग्ण न्यावा लागतो. गरीब रुग्णांसमोर अशावेळी फार अडचण निर्माण होते.मोठ्या संख्येने येथे रुग्ण येत असले तरी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांची संख्या वाढली तर डॉक्टरांचीसुद्धा फजिती होते. कित्येकदा एकाचवेळी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उपचारात कमी-जास्त झाल्यास संपूर्ण दोष मात्र डॉक्टरांना दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. त्यामुळे पैशाचा तुटवडा असला तरी लहान बालक, हृदयरोग, मेंदूविकार, अपघाती रुग्ण अशा किती तरी आजारासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयच गाठावे लागते.