मुख्याध्यापक रामकृष्ण निब्रड नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST2020-12-15T04:43:39+5:302020-12-15T04:43:39+5:30

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरतर्फे दिल्या जाणाऱ्या नेशन बिल्डर अवॉर्डने (आदर्श शिक्षक) मुख्याध्यापक रामकृष्ण बापूराव निब्रड ...

Headmaster Ramakrishna honored with Nibrad Nation Builder Award | मुख्याध्यापक रामकृष्ण निब्रड नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित

मुख्याध्यापक रामकृष्ण निब्रड नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरतर्फे दिल्या जाणाऱ्या नेशन बिल्डर अवॉर्डने (आदर्श शिक्षक) मुख्याध्यापक रामकृष्ण बापूराव निब्रड यांना सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरतर्फे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत रामकृष्ण निब्रड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक आदर्श विद्यार्थी घडविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड (आदर्श शिक्षक) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरच्या अध्यक्ष रमा गर्ग, डॉ. किरण देशपांडे, डॉ. बांगडे, श्री. खांडरे यांची उपस्थिती होती.

Web Title: Headmaster Ramakrishna honored with Nibrad Nation Builder Award