चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते हरीश चंद्रभान ससनकर यांना सन २०१५-१६ चा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबरला जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शनिवारी एनसीपीए हॉल नरिमन पार्इंट मुंबई येथे प्रदान करण्यात आला. हरीश ससनकर यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले असून सामाजिक कार्यातही मोलाची कामगिरी बजावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}