मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगार महिलांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST2021-02-06T04:51:28+5:302021-02-06T04:51:28+5:30

सिंदेवाही : ५० हजारांची धाडसी चोरी करताना शहरातील नागरिकांनी अट्टल चोर महिलांना पकडून दिल्याची घटना गुरुवारी घडली. गुरुवारी दुपारी ...

Hardline criminal women caught in Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगार महिलांना पकडले

मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगार महिलांना पकडले

सिंदेवाही : ५० हजारांची धाडसी चोरी करताना शहरातील नागरिकांनी अट्टल चोर महिलांना पकडून दिल्याची घटना गुरुवारी घडली.

गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एका महिलेने ५० हजार रुपये काढले. या महिलेवर सुरुवातीपासून लक्ष देऊन असणाऱ्या मध्य प्रदेश येथील तीन महिलांपैकी एका महिलेने पैशाच्या बॅगला चिरा मारून पैसे घेऊन पळ काढला. मात्र, नागरिकांनी महिलांचा पाठलाग करून पैशासह महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन महिला अटकेत असून, एक महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. आरोपी महिलांची नावे रंजना बिरू सिसोदिया (वय १९) व राखी बिरू ससोदिया (४०, रा. रा. कटिया, मध्य प्रदेश) अशी आहेत. या दोन्ही महिला मध्य प्रदेश रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांनी दिली. पुढील तपास सिंदेवाही पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे करीत आहेत.

Web Title: Hardline criminal women caught in Madhya Pradesh