शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

हळदीकुंकू आणि विविध स्पर्धा

By admin | Updated: February 3, 2016 01:07 IST

लोकमत सखी मंच नागभीडतर्फे हळदी-कुंकू आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नागभीड : लोकमत सखी मंच नागभीडतर्फे हळदी-कुंकू आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सोमेश्वर मुगनकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी मुगनकर तर प्रमुख अतिथी म्हणून मालाताई देशमुख होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर आरती टहलानी यांनी स्वागत गीत सादर केले. देवांगणा खुणे यांनी वंदन गीत सादर केले.विविध स्पर्धेमध्ये उखाणे आणि तिळाचे पदार्थ या स्पर्धा घेण्यात आल्या. उखाणे स्पर्धेत सखींनी पर्यावरणावर, स्त्रीभ्रुण हत्या, स्त्रीवर होणारे अत्याचार, बेटी बचाओ बेटी पढाओ यावर उखाणे सादर केले.त्यानंतर तिळ-गुळाचे सुंदर अशा पाककृती सखींनी स्वत: बनवून आणल्या. त्यामध्ये तिळगुळाचे लाडू, वड्या, तिळगुळाच्या करंज्या, तिळाच्या चकल्या, मालाताई देशमुख यांनी तिळगुळाचे शिवलिंग, ओम, तिळगुळाचा दिवा इत्यादी अतिशय सुंदर असे पाककृती बनवून आणले.विशाखा जांगळे यांनी अतिशय सुंदर रांगोळी काढली. शोभा जीवतोडे यांचे सहकार्य लाभले. संचालन किरण गोडे यांनी केले. आभार रेखा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका संयोजिका रजनी घुटके आणि किरण गोडे यांच्यासह सखी मंच सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)