वन्यप्राण्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:16+5:302021-01-19T04:30:16+5:30

खताच्या ढिगाऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य राजुरा : तालुक्यातील काही गावात म्हशी व गाई मालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत ...

Haidos of wildlife | वन्यप्राण्यांचा हैदोस

वन्यप्राण्यांचा हैदोस

Next

खताच्या ढिगाऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य

राजुरा : तालुक्यातील काही गावात म्हशी व गाई मालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत साठविल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वच्छता अभियान राबवत असतानाच तालुक्यात मात्र स्वच्छतेची ऐशीतैशी होत आहे. मात्र संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात येत नाही.

नाल्याचा उपसा करण्याची मागणी

घुग्घुस : शहरातील काही वॉर्डातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाऊ शकत नाही. परिणामी ते साचून राहते, याकडे नगर परिषद प्रशासकांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

------------------

रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

चंद्रपूर : बाबूपेठमधील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीस अडथळा होत आहे. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली.

Web Title: Haidos of wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.