शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांना अभिवादन कार्यक्रम

By admin | Updated: November 19, 2016 00:58 IST

१९ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जयंती दिवस म्हणून साजरा केला

चंद्रपुरात विविध कार्यक्रम : संगीत संध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजनचंद्रपूर : १९ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जयंती दिवस म्हणून साजरा केला जाते. १९ नोव्हेंबर २०१६ ते १९ नोव्हेंबर २०१७ हे इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण देशात साजरा होत असून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प अखिल भारतीय काँगे्रस पक्षाने केला होता. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर शनिवारला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० वाजता प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील काँग्रेसच्या सर्व फंटलच्या तसेच विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीतर्फे सकाळी १० वाजता प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथे स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाचा कार्यक्रम तसेच ‘एक शाम इंदिरा जी के नाम’ संगीत संध्या सांस्कृतिक कार्यक्रम गांधी चौक, महानगरपालिकेच्या खुल्या पटांगणावर सायंकाळी ६ आयोजित केले आहे. या कार्यक्रमास सर्व आमदार, माजी आमदार, माजी खासदार, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, सर्व काँग्रेस फंटाल आॅरगनायझेशन, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी कळविले आहे.