शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

अटी-शर्थीसह उद्योगांना हिरवाकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या.

ठळक मुद्देनिम्मे उद्योग बंदच : कमी कर्मचाऱ्यांमुळे उत्पादनावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाने ग्रिन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या अटी पाळत उद्योग सुरू करण्यात अनेक अडचणी येत असल्याने चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच आहेत.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना वर्गवारीत ग्रिन झोन ठरविण्यात आले. या ग्रिन झोनमधील उद्योगांना सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र सोबतच काही अटीही लादण्यात आल्या. मात्र या अटींना अधीन राहून उद्योगात उत्पादन घेणे कठीण असल्याचे बहुसंख्य उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ८० पैकी ४० उद्योग अद्यापही बंदच आहे.या अडचणींचा सामनाउद्योगांमध्ये आधीच मोजके कर्मचारी ठेवले जातात. त्यातही ५० टक्के कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे आदेश असल्याने केवळ ५० टक्के कर्मचाºयांच्या भरोशावर उत्पादन घेणे शक्य होत नाही. १० ते १५ टक्के कर्मचारी उद्योजक कमी करू शकतात. याशिवाय उद्योगात काम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे प्रत्यक्षात शक्य नाही. उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल बाहेरून बोलवावा लागतो. तो आणताना अनेक अडचणी येतात. लॉकडाऊनमुळे उत्पादित होणारा अर्धा माल विकला जात नाही. त्यामुळे चंद्रपूर एमआयडीसीतील ५० टक्के उद्योग बंदच ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा यांनी दिली.अशा आहेत अटीउद्योग सुरू करताना उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. ट्रान्सपोर्र्टींगसाठी येणाºया वाहनांना गेटवरच सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. उद्योगात काम करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रत्येक कर्मचारी, कामगारांना सुरक्षा प्रदान करावी, अशा अनेक अटींचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.सिमेंट उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ५० टक्के उपस्थिती, सोशल डिस्टंन्सिंग व कामगारांची सुरक्षा आदीबाबत दिशानिर्देशाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना उद्योजकांना देण्यात आली आहे.-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.सिमेंट उद्योगांना सुरुवातचंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिमेंट उद्योग आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग आतापर्यंत बंद होते. मात्र शासनाने २० एप्रिलपासून सिमेंट उद्योगांना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार २० एप्रिलपासून सिमेंट उद्योग सुरू करण्यात आले आहे. मात्र या उद्योगात केवळ ५० टक्केच कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी