शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत कोरम पूर्ण होऊनही ग्रामसभेला स्थगिती

By admin | Updated: February 3, 2016 01:10 IST

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आयोजित ग्रामसभेचा कोरम पूर्ण होऊनही ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

वासेरा ग्रामपंचायत : ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभारवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आयोजित ग्रामसभेचा कोरम पूर्ण होऊनही ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ग्रामसभा आयोजित करण्यात आली. त्यात विषय क्रमांक १ ते १४ ठेवण्यात आले. विषय क्रमांक १ ते १४ पर्यंतच्या विषयाची चर्चा सुरू करण्यात आली. त्यात सभाध्यक्ष म्हणून सरपंच सरिता मेश्राम यांची निवड करण्यात आली. सभेला सुरुवात होऊन विषय क्रमांक १ ते १४ ला चर्चेसाठी घेण्यात आले. विषय क्र. १४ इको डेव्हलपमेंट समितीची निवड करणे हा होता. त्यानुसार निवड प्रक्रीया सुरू झाली. त्यात ग्रामपंचायत गटातून आठ सदस्यांची निवड करण्यात आली. नंतर उर्वरित नावे येण्यास सुरुवात झाली असता वासेरा येथील ग्रामविकास अधिकारी महेंद्र भडके यांनी हेतुपुरस्सर स्वत:च्या मर्जीने ग्रामसभा स्थगित झाल्याचे ग्रामस्थांना सांगून सभा गुंडाळली.ग्रामसभेला सुरुवात झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी महेंद्र भडके हे विषय सुचीवरील विषयाचे वाचन करीत होते. १ ते १३ विषय संपून १४ व्या विषयाला सुरुवात झाली त्यात इको डेव्हलपमेंट समिती गठीत करणे हा १४ वा विषय होता. त्यात ग्रामपंचायत गटातून सदस्यांचे निवड करणे होते. त्यात आठ सदस्यांची निवड करण्यात आली. नंतर वेगवेगळ्या आरक्षणातून निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यात एकापेक्षा जास्त नावे आली. निवडणूक प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने ग्रामसभा स्थगित झाल्याचे जाहीर केले. ग्रामसभेला कधी नव्हे एवढी विक्रमी उपस्थिती होती.गावकऱ्यांमध्ये रोषकोरम पूर्ण असतानाही ग्रामसभा स्थगित करणे हे बेकायदेशिर असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. ग्रामसभेत गोंधळ झालेला नाही तरी ग्रामसभा कशी काय स्थगित केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावकऱ्यांची विक्रमी उपस्थिती असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याने पोलिसांना पाचारण केले. गोंधळ झाला असता तर पोलीस उपस्थित होतेच परंतु गोंधळ झाला नाही तरी ग्रामसभा स्थगित करण्यात आली.विषय क्र. १४ सुरू असताना एकापेक्षा जास्त नावे आले तसेच इको डेव्हलपमेंट समिती स्थापना करणे विषय ठेवण्यात आला होता. इको डेव्हलपमेंट समितीबाबत वनविभागाने परीपत्रक न दिल्याने सभा स्थगित केली.- महेंद्र भडके,ग्रामविकास अधिकारी, वासेराइको डेव्हलपमेंट समिती गठीत करताना ग्रामपंचायतीतून आठ सदस्य निवडले. ग्रामसभेत गोंधळ झाला नाही. ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वत:च्या मनमानी कारभाराने सभा स्थगित केली. याबद्दल आम्ही वरिष्ठस्तरावर तक्रार करून न्याय मागणार आहोत. - योगराज आनंदे, राजू नंदनकर, दिलीप मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य