शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला भिजलेल्या धान्याचा पुरवठा

By admin | Updated: October 1, 2015 01:18 IST

अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्य वितरीत केले जाते.

माल उचलण्यास प्रशासनाचा नकार : धान्यासाठी करावी लागणार प्रतीक्षाचंद्रपूर : अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्य वितरीत केले जाते. यासाठी आॅक्टोबर महिन्याचे शेकडो क्विंटल धान्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाले आहे. मात्र हे धान्य पावसाने भिजले असून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे धान्य उचलण्यास नकार दिल्याची माहिती हाती आली आहे. निकृष्ठ दर्जाचे धान्य गरिबांना वितरीत करून आक्रोश ओढवून घेण्यापेक्षा चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करा, तेव्हाच धान्याची उचल केली जाईल, असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धान्य मिळण्याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असून गरिबांना धान्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची पाळी आली आहे. राज्य शासन दर महिन्याला जिल्हा प्रशासनाच्या मागणीप्रमाणे धान्याचे नियतन मंजूर करत असते. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार आॅक्टोबर महिन्याचे धान्य नियतन मंजूर करून जिल्हा प्रशासनाला धान्य पुरवठा करण्यात आले. पुरवठा करण्यात आलेले धान्य हे पंजाब राज्यातून आलेला असून सर्व धान्य पावसात भिजलेला आहे. दहा ते पंधरा दिवसांपुर्वी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसात हे धान्य भिजून खराब झाले आहे. धान्याची खराब वास येत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धान्याची चौकशी करून माल उचलण्यास स्पष्ठ नकार दिल्याची माहिती आहे. पुरवठा करण्यात आलेले धान्य वखार महामंडळाच्या गोदामात असून हे धान्य शासनाला परत पाठवून चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करा, तरच धान्याची उचल करून शिधापत्रिकाधारकांना वितरीत केला जाईल, असा दम वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)