बालमृत्यू व माता मृत्यूला शासन जबाबदार

By Admin | Updated: December 21, 2014 22:57 IST2014-12-21T22:57:52+5:302014-12-21T22:57:52+5:30

‘अच्छे दिन’च्या नावाने सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र आश्वासन आता फोल ठरत आहे. आशा वर्करच्या मिटींग भत्यात दुप्पट वाढ करण्यात येईल, बिपीएल प्रमाणे एपीएल महिलेच्या प्रसुतीचा मोबदला देण्यात येईल,

The government is responsible for the deaths and deaths of the children | बालमृत्यू व माता मृत्यूला शासन जबाबदार

बालमृत्यू व माता मृत्यूला शासन जबाबदार

रमेश दहिवडे यांचा आरोप : आशा वर्करचा मेळावा
चंद्रपूर : ‘अच्छे दिन’च्या नावाने सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र आश्वासन आता फोल ठरत आहे. आशा वर्करच्या मिटींग भत्यात दुप्पट वाढ करण्यात येईल, बिपीएल प्रमाणे एपीएल महिलेच्या प्रसुतीचा मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन मागील सरकारने दिले होते.यात वाढ करण्याचे तर सोडाच केलेल्या कामाचा मोबदला देखील देण्यात येत नाही. बालमृत्यू व माता मृत्यूला शासन जबाबदार आहे. असे मत प्रा. रमेश दहीवडे यांनी व्यक्त केले.
आशा वर्करचा मेळावा अभंगा चहांदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मनिषा सारंगधर म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा प्रारंभ २००५ मध्ये करण्यात आला. अभियान यशस्वी करण्याकरिता गावपातळीवर आशा वर्करची नेमणूक करण्यात आली. वेतन नाही, मानधन नाही, केलेल्या कामाचा मोबदला सांगण्यात आला. कामाचा मोबदला तर सोडाच एक वर्षांपासून मिटींग भत्ता देखील देण्यात आला नाही. आशा वर्करने कसे जगायचे असा प्रश्न त्यांनी केला. आभार किशोरी तालेवार यांनी मानले. यावेळी आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The government is responsible for the deaths and deaths of the children