शासकीय अभियांत्रिकीने पेटेंट वाढविण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:28+5:30

नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमठेकर व चंद्रपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर उपस्थित होते. सहसंचालक डॉ. निबुदे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाचे विविध उपक्रम महाविद्यालयात कसे राबविता येतील याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. विविध विभाग आणि कार्यशाळा, वसतिगृह, ग्रंथालयाची पाहणी केली.

Government engineering should emphasize increasing patents | शासकीय अभियांत्रिकीने पेटेंट वाढविण्यावर भर द्यावा

शासकीय अभियांत्रिकीने पेटेंट वाढविण्यावर भर द्यावा

ठळक मुद्देराम निबुदे : विविध प्रकल्पांची विभागीय सहसंचालकांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण कमी करून झिरो ड्रॉप आउटचे लक्ष्य साध्य करावे. शिवाय त्याचबरोबर महाविद्यालयात पेटेंटस कसे वाढवता येतील, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना नागपूर विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी दिल्या. चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमठेकर व चंद्रपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर उपस्थित होते. सहसंचालक डॉ. निबुदे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाचे विविध उपक्रम महाविद्यालयात कसे राबविता येतील याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. विविध विभाग आणि कार्यशाळा, वसतिगृह, ग्रंथालयाची पाहणी केली. प्राचार्य डॉ. बेडेकर यांनी महाविद्यालयातील सर्व विभागांनी मिळविलेल्या विशेष उपलब्धी, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांचा आढावा सादर केला. प्राचार्य डॉ. कुमठेकर यांनीही शैक्षणिक, प्रशासकीय बाबींची माहिती दिली. चंद्रपूर व नागपूर येथील अभियांत्रिकीद्वारे विविध कार्यक्रम कसे आयोजित करता येतील, यावर मत व्यक्त केले. संचालन प्रा. एस. आर. वाघ यांनी केले. आभार डॉ. प्रशांत वाशिमकर यांनी मानले. आयोजनासाठी प्रा. डॉ. सुरजुसे, प्रा. डॉ भूतडा, प्रा. डॉ. अकोजवार, प्रा. डॉ. इंगोले, प्रा. डॉ. राजुरकर, प्रा. पेचे, प्रा. डॉ. वानखेडे, प्रा. रझा, प्रा. डॉ खोब्रागडे, प्रा. चौधरी, प्रा निखाडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा आढावा
अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सुविधांची पुर्तता होते की नाही, याची माहिती सहसंचालक राम निबुदे यांनी घेतली. प्राध्यापक व अन्य कर्मचाºयांशी संवाद साधला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गुणात्मक विकासासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. विविध अभ्यास शाखांचे विद्यार्थी आजच्या स्पर्धेत टिकावे. गुणवत्तेत कदापि मागे पडू नये, यासाठी लक्ष दिले जात आहे.
- डॉ. पी. पी. बेडेकर, प्राचार्य

Web Title: Government engineering should emphasize increasing patents