शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मासळी मार्केट बनले जुगाराचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:24 IST

तुर्भे स्टोअरमधील प्रकार; दोन वर्षांपासून मार्केट वापराविना पडून

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथील मासळी मार्केट वापराविना पडून असल्याने ते जुगाराचा अड्डा बनले आहे. रात्री-अपरात्री त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांच्या टोळ्या जमत आहेत. दोन वर्षांपासून हे मार्केट वापराविना पडून असल्याने ते मच्छीमारांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे.ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे रस्त्यालगतची जागा फेरीवाल्यांनी व्यापली आहे, यामुळे रहदारीला अडथळा होत असून पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. परिणामी, त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्या ठिकाणी बसणारे मच्छीमार अनेक वर्षांपासून रस्त्यालगत व्यवसाय करत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार तुर्भे स्टोअर येथे मासळी मार्केट बनवण्यात आले आहे. मात्र, मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटला, तरीही या मार्केटचा ताबा मच्छीमारांकडे देण्यात आलेला नाही. पालिका अधिकाºयांकडून तिथल्या जागावाटपाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याने अद्यापही मासळीविक्रेत्यांना रस्त्यालगतच बसावे लागत आहे. परिणामी, या मार्केटच्या जागेवर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी ताबा मिळवला आहे.दिवस-रात्र त्या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालत आहेत, तर रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गर्दुल्ले एकत्र जमत असल्याने पालिकेच्या वास्तूचा गैरवापर होत असल्याची टीका शेकापचे नवी मुंबई कार्यालय चिटणीस गोविंद साळुंखे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिकेकडे तक्रार करून सदर मासळी मार्केटमधील ओटेवाटप करून मच्छीविक्रेत्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच वापराविना पडून असलेल्या मासळी मार्केटच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमून तिथल्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.