शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी बल्बच्या लाभापासून गोंडपिपरी तालुका वंचित

By admin | Updated: December 25, 2015 00:31 IST

राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला.

आक्सापूर: राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला. या बल्बमुळे ५० टक्क्यापेक्षा जास्त वीजेची बचत होत असल्यामुळे पंडीत दिनदयाल उपाध्याय जिवन ज्योती योजना आणण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब, सर्वसामान्य नागरीकांना स्वस्त दरात एलईडी बल्ब पुरवठ्याचा प्रयत्न आहे. ही योजना जिल्ह्यातील अनेक तालुक्यापर्यंत पोहचली आहे. मात्र गोंडपिपरी तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी झालीच नसल्याने आणि याचा फायदा एकाही ग्राहकाला न मिळाल्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.एकीकडे वीजेच्या वापरात वाढ होत असताना उत्पादनात घट होत आहे. याचा अतिरिक्त भार वीजेच्या जास्त बिलामुळे स्वरूपात सर्वसामान्य ग्राहकावर पडत आहे. विजेची बचत कमी व्हावी यासाठी शासनातर्फे अनेक योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालणारे कित्येक साहित्य निर्माण केले आहे. पण हे सौर ऊर्जेवरील साहित्य महागडे व जास्त किंमतीचे असल्यामुळे त्याचा वापर मोजक्याच नागरिकानी घेतला. त्यानंतर यावर मात करण्यासाठी सीएफएल व एलईडी बल्ब बाजारात येवू लागले. परंतु ते महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरीक घेवू शकत नाही. त्यामुये यावर मात करुन सर्वसामान्य नागरीकांना देता येईल हा उद्देश ठेवून राज्य शासनाने पंडीत दिनदयाल उपाध्याय वीजन ज्योती योजना अंमलात आणली. शहरी व ग्रामीण भागातील लोकांना सात व्हॅटचे एलईडी बल्ब १०० रुपयोंमध्ये देण्याची योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही योजना शेवटच्या टप्प्यात चालू असली तरी मात्र गोंडपिपरी तालुक्यात पोहचलीच नसल्यामुळे या सुविधेपासून नागरीक वंचित आहे. वीजेचे बिल दर महिन्याला भरमसाठ येत आहेत. कमी वापर असतानाही जास्त बिलदिल्या जात असल्यामुळे वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नाराज आहेत. तरी ही योजना त्वरीत अंमलात आणून याचा लाभ गरीब सर्वसामान्य नागरीकांना मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)