शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी रूग्णवाहिका देणार

By admin | Updated: October 11, 2016 00:45 IST

येथील ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या मागणीनुसार येत्या महिनाभराच्या आत रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल,...

सुधीर मुनगंटीवार : २५१ ज्येष्ठ नागरिकांचा अम़ृतमहोत्सवी सोहळा चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या मागणीनुसार येत्या महिनाभराच्या आत रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या राज्याचा मंत्री म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण सदैव ज्येष्ठ नागरिक संघाच्या सोबत असल्याची ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे आयोजित २५१ ज्येष्ठ नागरिकांच्या अमृत महोत्सवी सोहळयात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष विजय चंदावार आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर मनपा क्षेत्रात ९ योग केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यासाठी ६.५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील सर्व नगर परिषद क्षेत्रात प्रत्येक ओपनस्पेसमध्ये योगकेंद्र स्थापन करण्याचे नियोजन करण्यात येत असून चंद्रपूर शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानातसुध्दा योग केंद्र स्थापन करण्यात येईल व याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. ज्येष्ठ नागरिक हा या समाजाचा प्रमुख घटक असून त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता व जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्रीहंसराज अहीर यांनी केले. यावेळी आ. नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. स्वागताध्यक्ष विजय चंदावार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. प्रास्ताविक सचिव केशव जेनेकर यांनी केले. संचालन रमेश मुलकलवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गोसाई बलकी, कोषाध्यक्ष प्रभाकर घटटूवार, सहसचिव अरूण दंतुलवार, अशोक संगीडवार, सुधीर मुनशेटटीवार, मोहन रायपुरे, मारोतराव मत्ते, अरविंद मुच्चूलवार, दादाजी नंदनवार, महादेव वांढरे, सरोज उपगन्लावार बोनगीरवार आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)इरईचे पुनरूज्जीवन करून इरई रिव्हर फ्रंटइरई नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून गुजरातमधील साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर इरई नदी रिव्हर फ्रंट तयार करण्यात येत आहे. याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील. चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानकाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असून तेथेसुध्दा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा करण्यात येतील. म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरे उपलब्ध करण्याची योजना प्रस्तावित आहे. यावरही लवकरच कार्यवाही करण्यात येईल. नोव्हेबर महिन्यात चंद्रपुरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित विख्यात तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची विशेष तपासणी या शिबिरात करण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.