शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांची देयके थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ७८१ घरकूल मंजूर असून केवळ ८५ पूर्ण झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकूल योजनेत १८१ घरकूल मंजूर झाले. परंतु, यातील केवळ २० कामांना सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देलाभार्थी चिंताग्रस्त : रेतीचा पुरवठा ठप्प, केवळ दहा घरांचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : निधी व रेतीच्या अभावामुळे पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, रमाई व शबरी योजनेच्या घरकुलांची देयके रखडल्याने लाभार्थी चिंता व्यक्त करीत आहेत.मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ७८१ घरकूल मंजूर असून केवळ ८५ पूर्ण झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकूल योजनेत १८१ घरकूल मंजूर झाले. परंतु, यातील केवळ २० कामांना सुरूवात झाली आहे. यावर्षी घरकूल योजनेसाठी अल्पसा निधी मिळाला. रेती घाटांचे लिलाव न झाल्याने शेकडो नागरिक बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. घरकुलाची देयके पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आले. मात्र, निधीअभावी देयक अडकली आहेत.घरकुलांसाठी अनेकांनी हातउसने पैसे घेतले. तर अनेक दुकानदारांकडून लोहा, सिमेंट व इतर साहित्यांची खरेदी उधारीवर केली. त्या दुकानदाराकडून उधारी मागण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मात्र लाभार्थ्यांना देयके मिळत नसल्याने पैसे देण्यास अडचण जात आहे. त्यामुळे घरकूल योजनेतील थकित देयके त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी मूल पं. स. मधील लाभार्थ्यांकडून होत आहे.घरकुलांची देयके पंचायत समितीच्या लेखा विभागात सादर झाल्याची माहिती आहे. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने शेकडो लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले. त्यामुळे शासनाने तात्काळ निधी दिला पाहिजे.- संदीप कारमवार, उपसभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती मूलघरकूल बांधकामासाठी रेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. निधी मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची देयके अदा होणार आहेत.- मनोज देशमुख, ग्रामीणगृह निर्माण अभियंता पं.स.मूलअनेक कुटुंब उघड्यावरघरकूल मंजूर झाल्यानंतर अनेक कुटुंबांनी स्वत:चे राहते घर पाडून टिनाचे पत्रे, बांबूच्या चपाट्या यापासून घर बांधून वास्तव्य करीत आहेत. मात्र घरकुलाचे देयके अडकले तसेच रेतीचा पुरवठा होत नसल्याने बांधकाम रखडले आहे. सद्या कोरोनाची दहशत पसरली आहे. या दहशतीतही अनेक कुटुंब उघड्यावर जीवन जगत आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना