शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूरला मिळाली नगरपालिका

By admin | Updated: August 1, 2014 00:12 IST

औद्योगिक शहर गडचांदूर येथे नगर परिषद स्थापनेबाबतची अंतीम अधिसूचना आज (दि. ३१) नगर विकास मंत्रालयाने जाहिर केली आहे. १ आॅगस्टपासून नगर परिषद अस्तित्वात येत आहे.

सुभाष धोटेंच्या प्रयत्नांना यश : मंत्रालयातून अधिसूचना जारीगडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथे नगर परिषद स्थापनेबाबतची अंतीम अधिसूचना आज (दि. ३१) नगर विकास मंत्रालयाने जाहिर केली आहे. १ आॅगस्टपासून नगर परिषद अस्तित्वात येत आहे. घोषणेमुळे गडचांदूर नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.४० हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरात नगर परिषद स्थापनेची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केल्या जात होती. आमदार सुभाष धोटे यांनी सन २०१० पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन गडचांदूर नगर परिषद स्थापन केली आहे. गडचांदूर नगर परिषद स्थापनेसंबंधी प्राथमिक अधिसूचना ३१ आॅगस्ट २०१२ ला निघाली होती. महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून गडचांदूर नगर परिषद गठीत करण्यासाठी आक्षेप मागविले होते. या सर्व आक्षेपावर अंतिम निर्णय घेऊन तब्बल दोन वर्षानंतर अंतीम अधिसूचना निघाली आहे. अंतिम अधिसूचना काढण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. विरोधकांनी नगर परिषद स्थापनेसंबंधी अनेक अडथळे निर्माण केले होते. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनेसुद्धा गडचांदूर नगर परिषद स्थापनेचा विरोधात ठराव घेतला होता.मात्र या सर्व अडचणीवर मात करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन अखेरीस गडचांदूर नगर परिषद स्थापनेस यश मिळाले आहे. गडचांदूर नगर परिषद स्थापनेच्या अंतिम अधिसूचनेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २४ जुलैला स्वाक्षरी केली होती. गडचांदुरात नगर परिषद स्थापनेचे वृत्त येताच सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. आज गडचांदुरात जुलूस काढून गडचांदूरवासियांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गडचांदूर नगर परिषदेची नितांत गरज होती. ४० हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे करणे सहज शक्य नव्हते, त्यामुळे ग्रा.पं.ची तारांबळ उडत होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून आता विकास कामांना गती प्राप्त होणार आहे. शासनाने गडचांदूर नगर परिषद स्थापनेची घोषणा केल्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांचे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पंचायत समिती सभापती नागेराज मंगरुळकर, शहर काँग्रेस अध्यक्ष विजय ठाकूरवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी पं.स. सभापती महेंद्र ताकसांडे, सरपंच सुमन आत्राम, उपसरपंच पापय्या पोन्नमवार, डॉ. अनील चिताडे, विठ्ठलराव थिपे, माजी सरपंच शिवकुमार राठी, बाबाराव पुरके, डॉ. चरणदास मेश्राम, माजी शहर अध्यक्ष रमाकांत कोमावार, सतिश बेतावार, ग्रा.पं. सदस्य विक्रम येरणे, सागर ठाकूरवार, सिराज भाई, अहमद भाई, विकास भोजेकर, प्रभाकर क्षीरसागर, प्रा. शरद बेलोरकर आदींनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)