शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: October 17, 2015 01:38 IST

राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षा भूमी येथे भेट देत...

सुधीर मुनगंटीवार : दीक्षाभूमीला भेट देऊन केले अभिवादनचंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षा भूमी येथे भेट देत तथागत भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे वंदन केले.यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुपवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून १९२१-२२ या कालावधीत लंडन येथे त्यांचे वास्तव्य असलेल्या घराला ऐतिहासिक स्मारक म्हणून विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंतीवर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यासाठी १२५ कोटी रूपये निधीची तरतुद केली आहे. इंदु मिलच्या जागेवर उभारण्यात येणारे स्मारक जगातील उत्कृष्ट स्मारकांपैकी एक ठरणार असून यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी आ. नानाजी श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधिक्षक डॉ. संदिप दिवाण, महापौर राखी कंचर्लावार, नेते विजय राऊत, वनिता कानडे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)