बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

By Admin | Updated: October 17, 2015 01:38 IST2015-10-17T01:38:05+5:302015-10-17T01:38:05+5:30

राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षा भूमी येथे भेट देत...

The funds for the monument of Babasaheb will not be reduced | बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

सुधीर मुनगंटीवार : दीक्षाभूमीला भेट देऊन केले अभिवादन
चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षा भूमी येथे भेट देत तथागत भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे वंदन केले.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुपवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून १९२१-२२ या कालावधीत लंडन येथे त्यांचे वास्तव्य असलेल्या घराला ऐतिहासिक स्मारक म्हणून विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंतीवर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यासाठी १२५ कोटी रूपये निधीची तरतुद केली आहे. इंदु मिलच्या जागेवर उभारण्यात येणारे स्मारक जगातील उत्कृष्ट स्मारकांपैकी एक ठरणार असून यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी आ. नानाजी श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधिक्षक डॉ. संदिप दिवाण, महापौर राखी कंचर्लावार, नेते विजय राऊत, वनिता कानडे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The funds for the monument of Babasaheb will not be reduced