शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘त्या’ मतदारांच्या नखावर टिंबाऐवजी लावणार पूर्ण शाई; दोन्ही राज्यांत मतदान करू नये म्हणून उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 05:43 IST

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांत पाच हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांत पाच हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत. मतदारांनी दोन्ही राज्यात मतदान करू नये म्हणून मतदान केल्यावर डाव्या हाताच्या एका बोटावर नेहमीप्रमाणे केवळ टिंब न लावता त्या नखावर पूर्ण काळी शाई लावण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली. चंद्रपूर मतदारसंघात १८ एप्रिलला तर तेलंगणामधील आसिफाबाद मतदारसंघात १३ मे रोजी मतदान आहे.

असे आहेत मतदार- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांत २,६९४ पुरुष तर २,४२३ महिला असे एकूण ५,११७ मतदार आहेत.- यात पुडियालमोहदा मतदान केंद्रांतर्गत एकूण ७२२, कुंभेझरी १,४३५, भोलापठार ८३१, वणी (खु.) ६१२, महाराजगुडा ०१ आणि परमडोली केंद्रावर १,२१६ मतदार आहेत.

ती १४ गावे कोणती? महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा, येसापूर, भेलापठार, लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा), शंकरलोधी, महाराजगुडा, कोठा (बु.), परमडोली, मुकदमगुडा आणि लेंडीजाळा ही चौदा गावे असून या गावांवर दोन्ही राज्यांनी हक्क सांगितला आहे. न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रात असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. या गावातील ग्रामस्थांकडे तेलंगणा राज्यातील आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र असल्याने ते तेथे जाऊन मतदान करण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी दोन्ही राज्यात मतदानाचा हक्क बजावला आहे.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४