शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: October 20, 2014 23:08 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी ३० आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आता मात्र नगरसेवकांनी महापौर व उपमहापौर

विधानसभा संपली : आता नगरसेवकांची रणधुमाळीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी ३० आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आता मात्र नगरसेवकांनी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यावेळीही महापौर पद महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा महिला महापौरच चंद्रपूर नगरचा कारभार सांभाळणार आहेत.२०१२ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेवर शिवसेनेच्या युतीसोबत काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथम महापौर म्हणून संगिता अमृतकर यांची वर्णी लागली. उपमहापौरपदी शिवसेनेचे संदीप आवारी विराजमान झाले. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. त्यामुळे आता नवीन महापौर निवडून देणे गरजेचे आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ३० आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता गांधी चौकातील महापालिकेच्या नवीन इमारतीतील सभागृहात विशेष बैठक बोलाविली आहे. त्यासंबंधीच्या पत्रवजा सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. यात निवडणूक कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली आहे. आॅक्टोबर महिना यावेळी निवडणुकांनीच गाजत आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. सर्व राजकीय पक्षांनी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविल्याने राजकीय पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचारात गुंतला होता. १९ आॅक्टोबरला विधानसभेचा निकालही हाती आला. आता महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. नगरसेवकांच्या बैठका रंगात येऊ लागल्या आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेसच्या महापौर असल्या तरी सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये गटबाजी कायम आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ही गटबाजी संपुष्टात आल्याचे दिसून आले नाही. महिला खुल्या प्रवर्गासाठी महापौर पद राखीव असल्याने यावेळीदेखील पुरुष नगरसेवकांना संधी नाही. काँग्रेसमध्ये संगीता अमृतकरसह सुनीता अग्रवाल, राखी कंचर्लावार, सुनीता लोढिया, शिल्पा आंबेकर आदी महिला नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीत माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झाली होती. त्यानंतर एका प्रकरणात पुगलिया व महापौर संगिता अमृतकर, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, गटनेता संतोष लहामगे यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे आता मोर्चेबांधणीसाठी दोन्ही गटांकडून वेगळवेगळी मोर्चेबांंधणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीकडे भाजपाचे नगरसेवकही गांभीर्याने लक्ष देऊन आहेत. (शहर प्रतिनिधी)