अपघात करणाऱ्या सुमो चालकास चार महिन्यांचा कारावास

By Admin | Updated: May 1, 2015 01:12 IST2015-05-01T01:12:31+5:302015-05-01T01:12:31+5:30

हयगयीने वाहन चालविल्याने अपघात घडल्याच्या आरोपाखाली टाटा सुमो चालकाला वरोरा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी...

Four month imprisonment for Sumo driver | अपघात करणाऱ्या सुमो चालकास चार महिन्यांचा कारावास

अपघात करणाऱ्या सुमो चालकास चार महिन्यांचा कारावास

चंद्रपूर: हयगयीने वाहन चालविल्याने अपघात घडल्याच्या आरोपाखाली टाटा सुमो चालकाला वरोरा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी चार महिन्यांची शिक्षा सुनावली.
२९ डिसेंबर २०११ रोजी सकाळी १०.३० वाजता रमेश मारोती नन्नावरे, पुंडलिक पैकुजी मगरे व इतर प्रवासी टाटा सुमो क्र.एम.एच- ३४ एम- ९७४६ ने शेगाव वरुन वरोरा येथे जात होते. मार्गात सालोरी गावाजवळील शिव मंदिराजवळ वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाले. यामुळे प्रवाशी अपघात होऊन जखमी झाले. त्यापैकी पुंडलिक पैकुजी मगरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे भरती करण्यात आले. उपचारादरम्यान पुंडलिक यांचा मृत्यू झाला. घटनेच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन, शेगाव येथे गुन्हा दाखल करुन भादंविच्या कलम २७९, ३३७ व ३०४ अन्वये नोंदविला. हेड कान्स्टेबल मडावी यांनी संपूर्ण तपास करुन चालकाविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
शासनातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी अभियोक्ता व आरोपीचा अधिवक्ता यांचा युक्तिवाद ऐकून आरोपीला कलम २७९ अन्वये एक महिना सश्रम कारावास व दंड ५००, रूपये व ३०४ अ अन्वये दोन महिने सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड तर दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादीस पाच हजार रूपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Four month imprisonment for Sumo driver