जूनगावात सरपंच पदाचे चार दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST2021-02-06T04:51:12+5:302021-02-06T04:51:12+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलाकरिता राखीव झाल्याने निवडून आलेल्या चार महिलांपैकी कोण सरपंच होणार याची ...

Four candidates for the post of Sarpanch in Junagaon | जूनगावात सरपंच पदाचे चार दावेदार

जूनगावात सरपंच पदाचे चार दावेदार

पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलाकरिता राखीव झाल्याने निवडून आलेल्या चार महिलांपैकी कोण सरपंच होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल पाल यांच्या नेतृत्वात येथील ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली. तीन महिला बिनविरोध निवडून आल्या. झालेल्या निवडणुकीत एक महिला विजयी झाली. सातपैकी सातही जागा जिंकून राहुल पाल यांनी तालुक्यातच एक नवा इतिहास रचला. चार महिला सदस्य व तीन पुरुष सदस्य अशा एकूण सात सदस्यांच्या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी चारही महिला इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, येथील हाय कमांड असलेले राहुल पाल हे कुणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घालतात याकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Web Title: Four candidates for the post of Sarpanch in Junagaon