ब्रह्मपुरीत साडे चार लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:33+5:30

ब्रह्मपुरीत ठाणेदार बाळासाहेब खाडे रुजू होताच दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महार्गावरुन दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी करुन एमएच १२ बीजी ०७५७ या रंगाचे वाहन थांबवून तपासणी केली.

Four and a half lakh liquor stocks seized in Brahmapuri | ब्रह्मपुरीत साडे चार लाखांचा दारूसाठा जप्त

ब्रह्मपुरीत साडे चार लाखांचा दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देवाहनचालकाला अटक : नवे ठाणेदार अ‍ॅक्शनमध्ये; सततच्या धाडसत्राने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नाकाबंदी करुन चारचाकी वाहनातून १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा १५ पेट्या दारु जप्त केल्या. याप्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली.
ब्रह्मपुरीत ठाणेदार बाळासाहेब खाडे रुजू होताच दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महार्गावरुन दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी करुन एमएच १२ बीजी ०७५७ या रंगाचे वाहन थांबवून तपासणी केली. दरम्यान वाहनात दारु आढळून आली. यावेळी वाहनातून एक लाख रुपये किंमतीच्या १५०० बॉटल दारु व वाहन असा चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकास अटक केली. ही कारवाई निरीक्षक बाळासाहेब खाडे, डीबी पथकातील पोहवा खोब्रागडे, नापोशी रॉय, हेमके, पोशी शिवनकर कटाईत, मैंद आदींनी केली.

भद्रावतीमध्ये चार लाखांचा मुद्देमाल जप्त
भद्रावती : तालुक्यातील चारगाव नदीच्या पात्रातून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून नाकाबंदी केली. मात्र ते वाहन घेऊन पळताना त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. यावेळी वाहन सोडून ते पसार झाले. तीन मोटारसायकल चार लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी पाहाटे करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, सचिन गुरनुले, निकेश ढेंगे, विशाल बेझलवार यांनी केली.
 

Web Title: Four and a half lakh liquor stocks seized in Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.