शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वेतनासाठी वनकामगारांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. हे सर्व वन कामगार मध्य चांदा वनविभागात काम करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनविभागात रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना मागील १५ ते २० महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्याने कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरित देण्याच्या मागणीसाठी विदर्भ वन कामगार संघटनेच्या वतीने वनकामगारांनी मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांना निवेदन दिले.वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. हे सर्व वन कामगार मध्य चांदा वनविभागात काम करतात. वेतनाची मागणी केली तर कामावरून बंद करण्याची धमकी कामगारांना दिली जाते आणि या भीतीपोटी हे कामगार वेतनाविना काम करतात. थकित वेतनाची मुख्य वन संरक्षकाकडे संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. मात्र, या कामगारांना थकीत वेतन न देता कामावरून बंद करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.त्यामुळे कामगारांना थकित वेतन द्यावे तसेच कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, या मागणीसाठी विदर्भ वन कामगार संघटनेच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले.दिवसभर धरणे दिल्यानंतर सायंकाळी कामगारांच्या एका शिष्टमंडळाच्या वतीने मुख्य वनसंरक्षक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. थकित वेतन देण्याचे तसेच कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे प्रमोद गोडघाटे यांनी दिली आहे. या आंदोलनात मध्य चांदामधील वनकामगार मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग