शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाने केली ३० लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: September 10, 2014 23:33 IST

चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर कार्यालयाने शासनाने दिलेले वृक्षलागवडीचे लक्षांक पुर्ण केले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागात नैसर्गिक व श्रमदानाने ३० लाख

चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर कार्यालयाने शासनाने दिलेले वृक्षलागवडीचे लक्षांक पुर्ण केले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागात नैसर्गिक व श्रमदानाने ३० लाख वृक्षांची लागवड झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली वृक्षतोड त्यामुळे जंगल क्षेत्राचा होणारा ऱ्हास व ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी शासनाकडून दरवर्षी वनविभागाला वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक दिले जाते. यावर्षी चंद्रपूर वनवृत्ताला ३० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष दिले होते. यात वनवृत्ताच्या तिनही वनविभागाने हे लक्ष पूर्ण केले आहे. मध्य चांदा वन विभागात ३१ मार्च पूर्वी श्रमदानाने १ लाख ९६ हजार वृक्षांची लागवड झाली. तर चंद्रपूर वनविभागात १ लाख ९८ हजार व ब्रह्मपुरी वनविभागात २ लाख ६८ हजार वृक्षांची लागवड झाली आहे. तर नैसर्गीक व कृत्रीम पध्दतीने चंद्रपूर वनविभागाच्या १२५५ हेक्टरवर ९ लाख ७८ हजार, ब्रह्मपुरी वनविभागाच्या १४४० हेक्टरवर ७ लाख ३८ हजार व मध्य चांदा वनविभागाच्या ११६० हेक्टरवर ६ लाख २९ हजार वृक्षांची लागवड झाली आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व जंगल क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने वनविभाग तसेच ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीचे उद्दीष्ठ दिले. यासाठी शासनाने ग्रामपंयातीला निधी दिला. १०० कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत अनेक ग्रामपंचायतीनी वृक्ष लागवड करण्यासाठी निधीची उचल केली. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष लावले नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच वृक्षलागवड योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.समितीच्या चौकशीवरुन वृक्ष ग्रामपंचायतीतील लागवडीचा नेमका आकडा समजणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)