शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाची सक्ती करा!

By admin | Updated: December 22, 2016 01:52 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये तसेच शाळा येथील ग्रामसेवक,

विकासही अडला : नागरिकांची कामे खोळंबली गुंजेवाही : राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये तसेच शाळा येथील ग्रामसेवक, पटवारी, शिक्षक, सिंचन विभागाचे क्लर्क यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश असतानाही त्या आदेशाला न जुमानता मुख्यालयी राहत नसल्याने जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्याची पाठराखन करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण जनतेला माहिती नसते. गावातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी व तलाठी, शिक्षक आहेत. त्यामुळे सदर कर्मचारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी जर ग्रामीण भागात मुख्यालयी असला तरी गावाचा विकास झपाट्याने होतो. ज्यावेळी शासकीय सेवेमध्ये रूजू होत असताना मुख्यालयी राहण्याची अट असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्तासुद्धा दिला जातो. परंतु त्या आदेशाला न जुमानता गरजेनुसार वागणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे वागत आहेत. प्रशासनाने कर्मचाऱ्याकरिता १५ टक्के प्रोत्साहन भत्ता व एक स्तर पदोन्नती लागु केली आहे. याचा लाभ घेणारे ८० टक्के कर्मचारी आपल्या सोयीनुसार तालुक्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. कधी वेळेवर तर कधी वेळेनंतर. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामविकास अधिकारी, पटवारी (तलाठी), डॉक्टर, शिक्षक, सुपरवाझर, केंद्र प्रमुख हे मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अध्यापनाच्या काळात शिक्षकांच्या सोबत असतात. ग्रामीण क्षेत्रात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांकरीता शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. मुख्यालयी शिक्षक राहत नसल्याने विद्यार्थ्यांवर वचक बसत नाही. पालकांचा शिक्षणाकडे कल कमी असतो. ग्रामीण भागाकडे पंचायत राज समितीचा दौराही येताना दिसत नाही. केवळ कागदावर अहवाल सादर केले जातात. याला प्रशासनच जबाबदार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र जनतेनी निवडुन दिलेले प्रतिनिधीही कर्मचाऱ्यावर वचक ठेवीत नसल्यामुळे कर्मचाऱ्याची मनमानी दिसून येत आहे. कर्मचारी स्वत:च्या कुटुबांच्या विकासाकरिता शहरी भागामध्ये ठाण मांडून बसतात. तालुक्याच्या ठिकाणात राहुन मोटारसायकलने ये-जा करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटत आहे. ग्रामविकास अधिकारी व तलाठी व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गावाच्या विकासाची गती दिवसेंदिवस कमी होत आहे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रासाठी हेलपाटे खावे लागत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)