किडनीचा पहिला रिसिव्हर सापडला ! हवालातून कोट्यवधी रुपये देशातून बाहेर पाठवल्याचा पोलिसांना संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:48 IST2026-01-07T15:46:50+5:302026-01-07T15:48:44+5:30

Chandrapur : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेद्वारे काढलेली किडनी स्वीकारणारी पहिली व्यक्ती पोलिसांना निष्पन्न झाली असून, तो काही दिवसांत चंद्रपूर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे.

First kidney recipient found! Police suspect crores of rupees were sent out of the country through hawala | किडनीचा पहिला रिसिव्हर सापडला ! हवालातून कोट्यवधी रुपये देशातून बाहेर पाठवल्याचा पोलिसांना संशय

First kidney recipient found! Police suspect crores of rupees were sent out of the country through hawala

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेद्वारे काढलेली किडनी स्वीकारणारी पहिली व्यक्ती पोलिसांना निष्पन्न झाली असून, तो काही दिवसांत चंद्रपूर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा कर्नाटकची राजधानी बंगळुरूशी थेट संबंध असल्याचे समजते.

किडनी डोनरला अवघे ८ लाख रुपये दिले जात असताना तीच किडनी गरजू; पण धनाढ्य रुग्णाला तब्बल एक कोटी रुपयांत विकली जात होती. या काळ्या बाजारातून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे आणि हवालामार्फत पैसे विदेशात पाठवण्यात आल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातून पोलिसांच्या हाती लागलेला किडनी पीडित मोहम्मद तारीक खान (३६, रा. लखनौ) याची किडनी त्रिची येथे काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्नम गोविंदसामी यांनीच केल्याचे तारीकने पोलिसांना सांगितले. फोटो पाहून दोघांची ओळखही पटवली आहे.

कंबोडियातून परतला, त्रिचीत काढली किडनी

रोशन कुळे याच्यासोबत मोहम्मद तारीक खान, शंकर, मनोज व सुमित हे डॉ. कृष्णा आणि हिमांशू भारद्वाज यांच्यासह कंबोडियाला गेले होते. तपासणीत तारीकचे रक्त कमी असल्याचे आणि त्याचा रक्तगट दुर्मीळ 'ओ' निगेटिव्ह असल्याने कंबोडियात शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. दुसऱ्या ब्लडबँकेमधूनही आवश्यक रक्त उपलब्ध न झाल्याने तो भारतात परतला. मात्र, महिनाभरानंतर डॉ. कृष्णाने पुन्हा संपर्क साधत 'कंबोडियाला जाण्याची गरज नाही, त्रिचीतच किडनी काढता येईल', असे आमिष दाखवले. त्याबदल्यात तीन लाख रुपये कमी करून फक्त पाच लाख रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीत असल्याने तारीक किडनी डोनेट करण्यास तयार झाला.

अटकेनंतरही अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी कशी?

  • डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जामुळे नवे वळण आले आहे.
  • डॉ. सिंग यांना यापूर्वीच पोलिसांनी दिल्लीत अटक केली होती. अटकेनंतरही तो थेट चंद्रपुरात येऊन अटकपूर्व जामिनाचा अर्ज कसा करू शकतो, असा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
  • डॉ. सिंग यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. या प्रकरणावर आज, ७जानेवारी रोजी निर्णय देणार असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title : गुर्दा रैकेट: पहला रिसीवर मिला; हवाला के जरिए विदेश में धन, पुलिस को शक।

Web Summary : चंद्रपुर पुलिस को किडनी बेचने के मामले में पहला किडनी रिसीवर मिला। किडनी ₹1 करोड़ में बेची गई, जबकि डोनर को ₹8 लाख मिले। पुलिस को हवाला के जरिए मनी लॉन्ड्रिंग का शक है।

Web Title : Kidney racket: First receiver found; money laundered abroad, police suspect.

Web Summary : Chandrapur police found the first kidney receiver in the kidney selling case. The kidney was sold for ₹1 crore, while the donor received ₹8 lakh. Police suspect money laundering via hawala.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी