शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषण वीज उपकेंद्रात आगीचे तांडव

By admin | Updated: April 2, 2016 00:46 IST

तालुक्यातील केरसी या गावाजवळ असलेल्या वीज उपकेंद्रात शॉक सर्किटमुळे आग लागली

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली : केसरी येथील घटना, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणावरोरा : तालुक्यातील केरसी या गावाजवळ असलेल्या वीज उपकेंद्रात शॉक सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे या उपकेंद्रात जिकडे तिकडे आगीचे तांडव सुरू होते. ही घटना १ एप्रिल रोजी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा घटनेला जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वरोऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर महापारेषण विद्युत उपकेंद्र ४०० केव्ही व २०० केव्ही असून औद्योगिक वसाहतीत असलेल्या जीएमआर पावर कंपनीत निर्माण होणारी वीज या उपकेंद्रात जमा होऊन राज्यात पुरवठा केला जातो. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे कचऱ्याला आग लागली आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. घटनेची माहिती वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशमक दलाला दिली तसेच जीएमआर कंपनीचेही अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही अग्निशमन दल घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वी आगीने उग्र स्वरूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी दोन्ही अग्निशमक दलाने शर्तीचे प्रयत्न केले. आग काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर दोन्ही अग्निशमन दलाने वरोरा येथील फिल्टर टाकीवर जावून पुन्हा टँकर भरुन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात पूर्णपणे यश आले. घटनास्थळावर सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मसराम, वाहतूक विभागाचे सुधीर तिवारी, प्रकाश दरेकार, मंगेश शेंडे, सादीक शेख यांनी आगीमुळे कोणतीही जीवीतहानी होणार नाही, यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)