शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी तत्काळ संपवा

By admin | Updated: October 9, 2016 01:30 IST

येथील काँग्रेस पक्ष आणखी मजबुत व बळकट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपवा, ...

अनेक समस्याही मांडल्या : अरूण धोटे यांचे प्रदेशाध्यक्षांना साकडेराजुरा : येथील काँग्रेस पक्ष आणखी मजबुत व बळकट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपवा, असे साकडे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण धोटे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घातले.माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी राजुरा येथे आले असताना अ‍ॅड. अरुण धोटे यांनी त्यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात व केंद्रात भाजपचे सरकार आलेले आहे. परंतु सत्ता आल्यानंतरसुद्धा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने नेत्यांना व कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची सवय राहिलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी गटबाजी संपविणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सत्ता गेली तरी गटबाजी संपलेली नाही, ही काँग्रेसजनासाठी अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात शालेय जीवनापासून काँग्रेस पक्षाचे आपण काम करीत आहोत व काँग्रेस पक्षाच्या अनेक पदावर पूर्वीपासून काम केलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा मजबुतीने उभा राहावा असे वाटते, असे मत अ‍ॅड. अरुण धोटे यांनी व्यक्त केले.मागील दोन महिन्यापासून सतत पडलेल्या पावसामुळे बल्लारपूर ते राजुरा तसेच राजुरा ते गडचांदूर रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सदर खड्डयावरील रस्ते त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना व जिवती भागात मोठ्या प्रमाणात वनजमिनीवर शेतकरी अनेक वर्षांपासून शेती करीत आहे. परंतु नवीन शासन शेतकऱ्यांना वनजमिनीवरुन हटवून जमीन ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल. जुन्या सरकारने वनजमिनीवर शेतकऱ्यांना पट्टे देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वनजमिनीवरील शेतकऱ्यांना त्वरीत पट्टे देण्यात यावे, ही मागणी शासनदरबारी लावून धरावी.राजुरा येथे मागील चार महिन्यापासून उपविभागीय अधिकारी यांचे पद रिक्त असून अतिरिक्त भार तहसीलदार यांच्याकडे आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकरणे प्रलंबित असून त्यांना निकाल लागलेला नाही. तसेच शेतकऱ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक महसुली विभागात करण्यात यावी.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतरसुद्धा प्रचंड प्रमाणात दारुची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे तरुण मुले व्यसनाधिन झालेले आहे व अनेक तरुण अवैध दारुच्या व्यवसायात गुंतलेले आहे. दारुची अवैध विक्री शासकीय व राजकीय आशिर्वादाने सुरू आहे. ही अवैध विक्री त्वरीत बंद करण्यात यावी.काँग्रेस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी कर्ज माफ केले होते. अजूनही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतमालाला योग्य तो हमीभाव दिला नाही. अगोदर दुष्काळाने शेतीचे नुकसान झाले व आता जास्त पावसाने नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून खर्च केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्जसाठी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करावी, अशी मागणी अ‍ॅड. अरुण धोटे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)